शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

वांगीतील निवासी शाळेला गळती

By admin | Updated: July 24, 2014 23:12 IST

विद्यार्थ्यांचे हाल : साडेचार कोटी पाण्यात

मोहन मोहिते - वांगी-कडेगाव तालुक्यातील वांगी येथील ४ कोटी ४२ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या निवासी शाळेला गळती लागली आहे. तालुक्यासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील मुला-मुलींची निवासी शाळा मंजूर झाली. मात्र कडेगाव येथे जागा उपलब्ध न झाल्याने वांगी ग्रामस्थांनी निवासी शाळेमुळे गावाचे नाव होईल, यासाठी जागा देऊन इमारत उभी केली. शासनाने ४ कोटी ४२ लाख रुपये इमारतीसाठी खर्च केले. या तीनमजली इमारतीचे उद्घाटन १ मे २०१२ रोजी झाले, पण सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे व निकृष्ट कामामुळे गळती सुरू झाली आहे. पहिल्या मजल्यावरील भोजनगृहाच्या छतातून पावसाचे पाणी येत आहे. निवासी खोल्या, स्वच्छतागृहामध्येही मोठ्या प्रमाणात गळती आहे. आतील फरशीही निकृष्ट दर्जाची आहे. यामुळे येथील कर्मचाऱ्यांना, मुलांना दुसऱ्या खोलीमध्ये हलवावे लागले आहे. दोनच वर्षात इमारतीची दुरवस्था झाली आहे. प्रभारी मुख्याध्यापिका सौ. एस. एम. जाधव म्हणाल्या की, याबाबत सा. बांधकाम विभागाला दोन पत्रे दिली आहेत. मात्र यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. पावसाळ्यात मुलांना गैरसोयीस सामोरे जावे लागत आहे.