सांगली : एलबीटीअंतर्गत व्याज व दंड सवलतीच्या अभय योजनेलाही सांगलीतील व्यापाऱ्यांनी फारसा प्रतिसाद दिलेला नाही. अद्यापही साडेतीन हजार व्यापाऱ्यांनी नोंदणी आणि कर भरलेला नाही. अभय योजनेची मुदत आज, सोमवारी संपुष्टात आली. त्यानंतर महापालिकेने कारवाईची तयारी सुरू केली असून फौजदारी दाखल असलेल्या ७५ व्यापाऱ्यांपासून कारवाईची सुरूवात केली जाणार आहे. अभय योजनेत एक हजार व्यापाऱ्यांनी लाभ घेतला असून ८ कोटी ६४ लाख रुपये भरले आहेत.सांगलीत २१ मे २०१३ रोजी एलबीटी लागू झाला. तेव्हापासून कर न भरणाऱ्या व नोंदणी न करणाऱ्या व्यापाऱ्यांना दंड व व्याजातून सूट देण्यासाठी अभय योजना लागू करण्यात आली. एक आॅगस्टपासून एलबीटी रद्द झाल्यानंतर या योजनेची मुदत ३१ आॅगस्टपर्यंत वाढविण्यात आली होती. आज या योजनेची मुदत संपली. महापालिकेला थकित एलबीटीतून १२० कोटी रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा होती. पण आता ती फोल ठरू लागली आहे. अभय योजना लागू झाल्यापासून सांगली महापालिका हद्दीतील साडेतीन हजार व्यापाऱ्यांनी विवरणपत्र दाखल केले आहे. पंधरा दिवसांच्या मुदतवाढीच्या कालावधित आणखी एक हजार व्यापाऱ्यांनी नोंदणी व विवरणपत्र दाखल केले आहे. आॅगस्ट महिन्यात एलबीटीतून महापालिकेच्या तिजोरीत ८ कोटी ६४ लाख रुपये जमा झाले आहेत, तर अभय योजना लागू झाल्यानंतर सुमारे २१ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. महापालिकेच्या म्हणण्यानुसार एकूण ८ हजार व्यापाऱ्यांनी एलबीटी कर लागू होतो. त्यापैकी साडेचार हजार व्यापाऱ्यांनी विवरणपत्र दाखल केले आहे. अजूनही साडेतीन हजार व्यापारी करापासून अलिप्त आहेत. अभय योजनेची मुदत संपताच महापालिकेच्या एलबीटी विभागाने कारवाईचे प्रस्ताव तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पहिल्या टप्प्यात न्यायालयात फौजदारी दाखल केलेल्या ५३ व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल. त्यानंतर जप्तीपूर्व नोटिसा दिलेल्या १३३ व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे एलबीटी अधीक्षक रमेश वाघमारे यांनी सांगितले. व्हॅटमध्ये नोंदणी नसलेल्या सुमारे ४४०० व्यापाऱ्यांना पालिकेने नोटिसा बजाविल्या आहेत. त्यांच्यावरही कारवाईचा प्रस्ताव आयुक्तांकडे ठेवला जाईल. महापालिकेने २०१३-१४ या वर्षातील व्हॅटधारक व्यापाऱ्यांची यादी विक्रीकर विभागाकडून घेतली आहे. व्यापाऱ्यांनी व्हॅटमध्ये दिलेले उत्पन्न व महापालिकेकडे दाखल विवरणपत्रातील उलाढाल यात तफावत असून त्याचीही तपासणी केली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी)४सर्व्हेनुसार नोंदणी : २०१६५४नोंदणीकृत व्यापारी : १०५०८४नोंदणी न केलेले : ४२३२४कर भरणाऱ्यांची संख्या : ४ ते ५ हजार४एप्रिल ते जुलैचे उत्पन्न : ३२ कोटी ८८ लाख४आजअखेरची तूट : १०७.१२ कोटी४जप्तीसाठी दिलेल्या नोटिसा : १३३४दुकान तपासणीचे आदेश : ६२४फौजदारी कारवाईची संख्या : ५३
एलबीटीची मुदत संपली, आता कारवाई
By admin | Updated: August 31, 2015 21:52 IST