शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
Crime News : धक्कादायक! रात्री उशिरा गावात गोळीबारचा आवाज झाला, जमिनीच्या वादातून दोन भावांना गोळ्या घातल्या
3
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' कामासाठी मिळणार ३० दिवस सुट्टी
4
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
5
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
6
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
7
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
8
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
9
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
10
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
11
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
12
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
13
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
14
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
15
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
16
‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
17
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
18
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
19
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल

तीन वर्षात ३२ भोंदूबुवांचा भांडाफोड

By admin | Updated: September 20, 2016 23:04 IST

सांगली ‘अंनिस’ची कामगिरी : २६ जणांविरुद्ध दोषारोपपत्र; नांद्रेतील मौलवीला कारावास

सचिन लाड -- सांगली --विज्ञानाचे रूप घेतलेल्या अंधश्रद्धेला सुशिक्षित वर्गानेही वाहून घेतल्याचे चित्र आहे. अंधश्रद्धेचे समर्थन करण्याची प्रवृत्ती वाढल्याने जिल्ह्यात भोंदूबुवांचे जाळेही मोठ्या प्रमाणात पसरले आहे. हे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची प्रभावीपणे मोहीम सुरु आहे. या मोहिमेंतर्गत गेल्या तीन वर्षात ३२ भोंदूबुवांचा भांडाफोड झाला आहे. या बुवांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल केले.समाजातील प्रत्येक कुटुंब कोणत्या ना कोणत्या समस्येने ग्रासलेले आहे. त्यांच्या असाहाय्यतेचा फायदा घेण्यासाठी भोंदूबुवांनी अंधश्रद्धेचा बाजार मांडला आहे. ‘मूल होत नाही, धंद्यात बरकत करुन देतो, पैशाचा पाऊस पाडतो, करणी दूर करतो, लग्न ठरवून देतो, मुलगा होण्यासाठी औषध देतो’... अशा अनेक समस्यांचे निराकरण करण्याची बतावणी करून बुवाबाजी पसरलेली आहे. पूर्वी गरीब लोकच अंधश्रद्धेला खत-पाणी घालतात, असा समज होता. पण अंधश्रद्धेला वाहून घेण्यात आजचा सुशिक्षित वर्गही पुढे आहे. समस्यांचा डोंगर घेऊन भोंदूबुवांसमोर माथा टेकविण्यासाठी पहाटेपासून रांगा लागलेल्या असतात. अंधश्रद्धेला खत-पाणी घालण्यात समाजाचा मोठा वाटा असल्याने, भोंदूबुवांची संख्याही वाढत आहे. राजकारण्यांपासून ते शासकीय अधिकारीही अंधश्रद्धेच्या जाळ्यात गुरफटलेले आहेत. श्रद्धा कशावर ठेवावी आणि कशावर नको, याचे भान प्रत्येकजण विसरत आहे. पैशाचा पाऊस पाडण्याची बतावणी करणाऱ्या भोंदूबुवावर विश्वास ठेवून नरबळी देण्याचा धक्कादायक प्रकारही आपल्या हातून होत आहे.अंधश्रद्धेच्या मागे लागलेल्या समाजाला रोखण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी जादूटोणाविरोधी प्रतिबंध कायदा करण्यासाठी लढा दिला. त्यांच्या लढ्याची दखल घेऊन शासनाने हा कायदा केला. या कायद्यामुळे भोंदूगिरीला बऱ्यापैकी चाप बसला आहे. या कायद्याचा आधार घेऊन सांगली ‘अंनिस’तर्फे भोंदूबुवांचे जाळे उद्ध्वस्त करण्याची मोहीम सुरु आहे. या मोहिमेंतर्गत गेल्या तीन वर्षात विविध समस्या सोडविण्याची बतावणी करुन भोंदूगिरीचा बाजार मांडलेल्या ३२ बुवांचा पर्दाफाश केला आहे. यातील २६ बुवांविरुद्ध जादूटोणाविरोधी प्रतिबंध कायद्यांतर्गत जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहा बुवांनी, ‘येथून पुढे बुवाबाजी करणार नाही’, असा पोलिसांसमोर लेखीनामा दिला. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले नाहीत. नांद्रे (ता. मिरज) येथील दर्ग्यातील मौलवीने व्यवसायात बरकत आणून देण्याचे आमिष दाखवून मित्राच्या पत्नीवर बलात्कार केला होता. या मौलवीला न्यायालयाने साडेचार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. सहा महिन्यापूर्वी याचा निकाल लागला आहे. जादूटोणाविरोधी कायद्यांर्गत शिक्षा झालेला जिल्ह्यातील हा पहिला निकाल आहे.गेल्या तीन वर्षात ३२ भोंदूबुवांना पकडण्याची कारवाई झाली आहे. यातील काही भोंदूबुवा पडद्याआड राहून पुन्हा बुवाबाजी करुन लागले आहेत. सांगलीत अशा दोन बुवांना अंनिसने पकडले आहे. त्यांच्याविरुद्ध पुन्हा गुन्हे दाखल केले आहेत. सध्या जे भोंदूबुवा पुन्हा अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करीत आहेत, त्यांचा अंनिसकडून शोध घेतला जात आहे. यासंदर्भात लोकांना काही माहिती असल्यास त्यांनी पुढे यावे, असे आवाहन केले आहेतक्रारदार वाढले : पोलिसांचे सहकार्य जादूटोणाविरोधी प्रतिबंध कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे राबविली जात असल्याने, भोंदूबुवांविरुद्ध लोक स्वत:हून अंनिसकडे तक्रार करण्यासाठी येत आहेत. गेल्या वर्षभरात सहा लोकांनी तक्रारी केल्या. अंनिसने या तक्रारींची चौकशी केली. ते स्वत: समस्या घेऊन भोंदूबुवाकडे गेले. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने त्यांच्यावर कारवाई केली आहे.अंधश्रद्धेला एकप्रकारे ‘राजमान्यता’ मिळत आहे. कायद्याची मदत घेऊन आम्ही अंधश्रद्धेचे जाळे उद्ध्वस्त करीत आहोत. तक्रारदार स्वत:हून आता पुढे येऊ लागले आहेत. गेल्या तीन वर्षात राज्यात २०० भोंदूबुवांना पकडले आहे. ज्या भोंदूबुवांना पकडले आहे; ते पुन्हा हाच व्यवसाय करीत आहेत का?, याचा आम्ही शोध घेत आहोत.- डॉ. प्रदीप पाटील, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सांगली.जागतिक अंधश्रद्धानिर्मूलन दिन विशेष