शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

कुंडल ग्रामपंचायतीस द्वितीय क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:26 IST

कुंडल ग्रामपंचायतीने लोकसहभागातून व सामूहिक पुढाकारातून विविध उपक्रम राबविले. परीक्षेस सामोरे जात असताना ग्रामपंचायतीने पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन, ...

कुंडल ग्रामपंचायतीने लोकसहभागातून व सामूहिक पुढाकारातून विविध उपक्रम राबविले. परीक्षेस सामोरे जात असताना ग्रामपंचायतीने पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन, शौचालय व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, वैयक्तिक स्वच्छता, लोकसहभागातून आणि वैयक्तिक व सामूहिक पुढाकारातून विकासासाठी राबविण्यात आलेले नावीन्यपूर्ण उपक्रम या बाबीअंतर्गत सर्व कामामध्ये विशेष काम केल्यामुळे जिल्ह्यामध्ये दुसरा क्रमांक आला आहे, तसेच पुढील तपासणीसाठी गाव पात्र ठरले आहे. स्वच्छता अभियानांतर्गत २०० गुणास अनुसरून, शासन निर्णयाप्रमाणे पुढील तपासणीपूर्वी पूर्तता करण्याचा ग्रामपंचायतीचा मानस आहे, तसेच नागरिकांनीही यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीने केलेले आहे.

कुंडल ग्रामपंचायतीने ‘माझी वसुंधरा’ अभियानामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. क्रांतिअग्रणी डॉ.जी. डी. (बापू) लाड यांच्या स्वप्नातील गाव होण्यासाठी सर्व घटकांचा सहभाग घेऊन ग्रामपंचायत सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. विधानपरिषद सदस्य आमदार अरुण लाड, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, क्रांती दुध संघाचे अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक किरण लाड, सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड पंचायत समिती सदस्य अरुण पवार यांचे मार्गदर्शन मिळत आहे. सरपंच प्रमिला पुजारी उपसरपंच माणिक पवार व सर्व ग्रामपंचायत सदस्य व प्रशासकीय यंत्रणा पुढील तपासणीसाठी पूर्तता करून स्पर्धेसाठी उतरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.