शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णा कारखाना एक कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:21 IST

शिरटे : रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने उत्पादित केलेल्या इथेनॉलचा पुरवठा ऑईल कंपन्यांना ...

शिरटे : रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने उत्पादित केलेल्या इथेनॉलचा पुरवठा ऑईल कंपन्यांना करण्यास सुरुवात झाली आहे. बी हेवी मोलॅसिसपासून या इथेनॉल निर्मिती करण्यात आली. पहिल्या इथेनॉल टँकरचे पूजन अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करून टँकर ऑईल कंपन्यांकडे रवाना केले. यंदा कारखान्याने एक कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

केंद्र सरकारने इथेनॉलबाबत घेतलेले सकारात्मक धोरण, इथेनॉलला मिळणारा योग्य दर लक्षात घेऊन, कृष्णा सहकारी साखर कारखान्याने बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती सुरू केली. गेल्या वर्षी २०२० मध्ये कारखान्याने बी हेवी मोलॅसिसपासून ५० लाख लिटर इथेनॉल उत्पादन व विक्री केली.

यावेळी संचालक पांडुरंग होनमाने, सुजित मोरे, मनोज पाटील, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, जनरल मॅनेजर (टेक्निकल) प्रसाद राक्षे, असिस्टंट जनरल मॅनेजर (डिस्टिलरी) प्रतापसिंह नलवडे, चंद्रकांत मिसाळ, गिरीश इस्लामपूरकर, पंकज पाटील, डी. व्ही. कुंभार, अरुण पाटील, सुयोग खानविलकर, डॉ. हर्षल निकम, आदी उपस्थित होते.

चौकट

इथेनॉल प्रकल्पाची गरुडभरारी

डॉ. सुरेश भोसले यांनी २००३ मध्ये २० हजार लिटर प्रतिदिन क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प उभारला होता. २०१६ ला प्रकल्पाचे आधुनिकीकरण करून ६० हजार लिटर प्रतिदिन क्षमतेच्या एम. एस. डी. एच. या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित इथेनॉल प्रकल्पाची उभारणी केली. २०२० मध्ये या प्रकल्पाची उत्पादन क्षमता ६० हजारांवरून ७८ हजार लिटर प्रतिदिन एवढी करण्यात आली आहे.

फोटो - १३०१२०२१-आयएसएलएम- कृष्णा कारखाना न्यूज

ओळ : रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील कृष्णा कारखान्याच्या कार्यस्थळावर इथेनॉलच्या पहिल्या टँकरचे पूजन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संचालक पांडुरंग होनमाने, सुजित मोरे, सूर्यकांत दळवी, मनोज पाटील उपस्थित होते.