शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

‘कृष्णा’वर रूबाब वाळव्याचा, दबाव जयंतरावांचा

By admin | Updated: June 30, 2015 23:17 IST

चर्चेला ऊत : नव्या समीकरणांबाबत तर्क-वितर्क; सत्ता स्थापनेसाठी दोन्ही नेत्यांमध्ये खलबते

अशोक पाटील - इस्लामपूर -रेठरे बुद्रुक येथील कृष्णा साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची माळ डॉ. सुरेश भोसले यांच्या गळ्यात पडणार, हे निश्चित असले तरी, वाळवा तालुक्यात मात्र नव्याच चर्चेला ऊत आला आहे. कारखान्यात माजी मंत्री आ. जयंत पाटील गटाचे वाळवा तालुक्यातील आठ, तर अविनाश मोहिते गटाचे सहा संचालक आहेत. हे दोघे एकत्र येऊन ‘कृष्णा’वर सत्ता स्थापन करतील का, याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत.‘कृष्णा’च्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक ४ जुलैरोजी होत आहे. कारखान्याच्या निवडणुकीची हवा वाळवा तालुक्यात आजही कायम आहे. तालुक्यातील बोरगावचे जितेंद्र पाटील वगळता सर्व संचालक आ. जयंत पाटील यांचे नेतृत्व मानणारे आहेत. या सर्व संचालकांनी निवडीनंतर लगेचच राजारामबापू साखर कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून निष्ठा दाखवली होती.प्रचारादरम्यान वाळवा तालुक्यातील संस्थापक आणि सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी डिजिटल फलकांवर जयंत पाटील यांची प्रतिमा झळकवली होती. त्यामुळे जयंत पाटील नेमके कोणाचे, असा प्रश्न उपस्थित झाला होता. अंतिमक्षणी त्यांनी अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनेलचे काम करा, असा सल्ला दिल्याचे बोलले जात होते. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अविनाश मोहिते यांनी इस्लामपूर येथे येऊन जयंत पाटील यांच्याशी दीड तास बंद खोलीत चर्चा केली. त्यावेळी ‘कृष्णा’वरील सत्ता स्थापनेबाबत खलबते झाली. ‘तुमचे आठ आणि माझे सहा असे मिळून सत्ता स्थापन करू’, असा प्रस्तावही मोहिते यांनी मांडल्याचे समजते. मात्र जयंत पाटील यांचे समर्थक असलेले आठ संचालक भोसले यांच्या पॅनेलमधूनच निवडून आले आहेत. त्यामुळे ते अशा हालचाली करणार का, याबाबत शंका उपस्थित होत आहे. कारखान्याचे अध्यक्षपद कऱ्हाड तालुक्याला आणि उपाध्यक्षपद वाळवा तालुक्याला हे समीकरण ठरले आहे, परंतु या चर्चेनुसार राजकीय खलबते झाली, तर ‘कृष्णा’वरील राजकारण पूर्णपणे बदलून जाणार आहे. येणाऱ्या चार दिवसात काय घडामोडी घडतात याकडे वाळवा, कऱ्हाड आणि कडेगाव तालुक्यातील सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे.कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत जरी माझे समर्थक निवडून आले असले तरी, माझे तिन्ही गटाच्या प्रमुखांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे मला ‘कृष्णा’मध्ये कसलेही स्वारस्य नाही. सत्तेबाबत माझ्या नावाची कोणीही ‘पावती’ फाडू नये!- जयंत पाटील, माजी मंत्री.