शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून सांगलीत कोविड केअर सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:25 IST

फोटो २४ शीतल ०१ (मेल) लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील प्रभाग १८ मधील विठ्ठलनगर येथील महात्मा गांधी विद्यालयात ...

फोटो २४ शीतल ०१ (मेल)

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शहरातील प्रभाग १८ मधील विठ्ठलनगर येथील महात्मा गांधी विद्यालयात ३५ खाटांचे कोरोना केअर सेंटर उभारण्यात आले आहे. नगरसेवक अभिजीत भोसले यांच्या प्रयत्नातून व लोकसहभागातून साकारत असलेल्या या केअर सेंटरमध्ये १५ ऑक्सिजन खाटांची सुविधा असणार आहे. औषधे, उपचारासह जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या हस्ते दोन दिवसांत या सेंटरचे लोकार्पण होणार आहे.

यावेळी काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, युवानेते विशाल पाटील, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती नगरसेवक भोसले यांनी दिली. शहरात उपचाराअभावी रुग्णांचे हाल होऊ नयेत, यासाठी नगरसेवक भोसले यांनी पुढाकार घेत, हनुमाननगर येथे कोविड केअर सेंटर उभा करण्याचा निर्णय घेतला. त्याला लोकांचाही प्रतिसाद मिळाला. अनेकांनी मदतीचा हात दिला. यातून ३५ खाटांचे कोविड सेंटर उभे करण्यात आले आहे. यामध्ये ऑक्सिजनयुक्त १५ खाटांची सोय करण्यात आली आहे.

नगरसेवक भोसले म्हणाले, यासाठी अनेकांनी हातभार लावला आहे. रुग्णांवर मोफत औषधोपचार करण्यात येणार आहेत. याशिवाय दोन वेळचे जेवण, चहा, नाश्त्याची सोय करण्यात आली आहे. केअर सेंटरसाठी आवश्यक डॉक्टर्स, परिचारिका घेण्यात आले आहेत. शहरातील काही नामांकित डॉक्टरांनीही या सेंटरमध्ये सेवा देण्याचे मान्य केले आहे. राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या हस्ते दोन दिवसांत या केअर सेंटरचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या कोरोना केअर सेंटरमुळे श्यामरावनगर, हनुमाननगर, विठ्ठलनगरसह परिसरातील रुग्णांना फायदा होणार आहे. प्रभागाच्या बाहेरील रुग्णांवरही या केअर सेंटरमध्ये उपचार केले जाणार आहेत.