शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

खानापूर तालुक्यात शिवसेना, कॉँग्रेसला प्रत्येकी दोन जागा

By admin | Updated: November 4, 2015 00:09 IST

ग्रामपंचायत पोटनिवडणूक : आठ बिनविरोध, तर सहा जागा रिक्त

विटा : खानापूर तालुक्यातील साळशिंगे, भडकेवाडी व शेडगेवाडी या तीन ग्रामपंचायतींच्या चार जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत कॉँग्रेसला दोन व शिवसेनेला दोन अशा समान जागा मिळाल्या. तालुक्यातील भाग्यनगर, साळशिंगे, घानवड, सांगोले, रामनगर, धोंडेवाडी, शेडगेवाडी, भडकेवाडी व जाधवनगर या नऊ ग्रामपंचायतींच्या १६ प्रभागातील १८ रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. परंतु, त्यातील भाग्यनगर, रामनगर, धोंडेवाडी, जाधवनगर या चार ग्रामपंचायतींच्या सहा जागांसाठी उमेदवारच मिळाला नसल्याने या जागा पुन्हा रिक्त राहिल्या आहेत, तर आठ ठिकाणी बिनविरोध निवडी झाल्या होत्या.अर्ज माघारीनंतर तालुक्यातील साळशिंगे, भडकेवाडी व शेडगेवाडी या तीन ग्रामपंचायतीमधील चार जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यासाठी रविवारी मतदान प्रक्रिया घेण्यात आली. मंगळवारी सकाळी विटा तहसील कार्यालयात मतमोजणी घेण्यात आली. त्यावेळी साळशिंगे ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र. ३ मधून कॉँग्रेसच्या शीतल महेंद्र जाधव यांनी शिवसेनेच्या उमेदवार उषा हणमंत जाधव यांचा पराभव केला. भडकेवाडी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र. २ मधून शिवसेनेच्या संजीवनी कुंडलिक बुर्ले विजयी झाल्या. त्यांनी कॉँग्रेसच्या शांताबाई नाथा शेंडगे यांचा पराभव केला. शेडगेवाडी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र. १ व ३ साठी पोटनिवडणूक झाली. प्रभाग क्र. १ मधून शिवसेनेच्या मंदाकिनी शिवाजी दळवी यांनी कॉँग्रेसच्या उमेदवार उषाताई बाबासाहेब दळवी यांचा एका मताने पराभव केला, तर प्रभाग क्र. ३ मधून कॉँग्रेसचे बाबासाहेब सोपान दळवी यांनी शिवसेनेचे उमेदवार शिवाजी पतंगा दळवी यांचा केवळ दोन मतांनी पराभव करून अत्यंत चुरशीने विजय संपादन केला. त्यामुळे तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या चार जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत कॉँग्रेसने दोन, तर शिवसेनेने दोन जागा जिंकल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ओ. एस. उरकुडे, श्रीपाद जोशी व डी. एल. मसुगडे यांनी काम पाहिले. (वार्ताहर)सहा जागा बिनविरोध...घानवड-परशुराम पांडुरंग रावताळे, सांगोले-विमल हणमंत करडे, अनिता भगवान कुंभार, रामनगर-सचिन कुमार थोरात, पुरुषोत्तम उत्तम थोरात, शालन विष्णू थोरात, धोंडेवाडी-मधुकर दत्तात्रय सुतार, भडकेवाडी - संजीवनी कुंडलिक बुर्ले निवडून आले आहेत. या पोटनिवडणुकीवेळी उमेदवारच मिळाला नसल्याने भाग्यनगर येथील एक, रामनगर ग्रामपंचायतीतील दोन, धोंडेवाडीमधील एक व जाधवनगर येथील दोन जागा अशा सहा जागा रिक्त राहिल्या आहेत. यामुळे येथे पुन्हा पोटनिवडणूक घ्यावी लागणार का, असा प्रश्न आहे.