शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

खानापूर, आटपाडीत पेटणार ‘टेंभू’चे पाणी

By admin | Updated: October 21, 2015 23:17 IST

राजकीय वातावरण गढूळ : संघर्ष सोडून सामूहिक प्रयत्नांची गरज

दिलीप मोहिते - विटा--खानापूर मतदार संघाचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या ‘टेंभू दिवास्वप्न’च्या वक्तव्यावरून आमदार अनिल बाबर यांनी सदाभाऊंना हैराण केले होते. परंतु, आता आ. बाबर यांच्या एका विधानाचा धागा पकडून सदाभाऊंचे पुत्र व विट्याचे नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी आ. बाबर यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच दुसरीकडे टेंभू योजना कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांनी नियोजनातील त्रुटींचा झेंडा खांद्यावर घेऊन तालुका ढवळून काढला आहे. त्यामुळे आता ‘टेंभू’चे पाणी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजकीय पटलावर ‘टेंभू’चे पाणी गढूळ झाल्याने कॉँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेत राजकीय संघर्षाची ठिणगी पडली आहे. खानापूर विधानसभा मतदार संघात गेल्या अनेक निवडणुका ‘टेंभू’च्या मुद्द्यावर गाजल्या व गाजविल्या गेल्या. सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी व स्टार प्रचारकांनी ‘टेंभू’चे पाणी अक्षरश: दुष्काळग्रस्तांच्या बांधावर पोहोचविलेही; मात्र ते कृत्रिमरित्याच! त्यामुळे बांधापर्यंत आलेले पाणी आता शेतात येणार, या आशेने दुष्काळग्रस्त मतदारांनी खानापूर-आटपाडी तालुक्यातील प्रतिनिधीत्व मुंबईत पाठविले. परंतु, तेथे ‘टेंभू’च्या पूर्णत्वासाठी काय प्रयत्न झाले, हा खरा प्रश्न आजही दुष्काळग्रस्तांना नेहमीच सतावत आहे.गेल्या पाच ते सात वर्षापूर्वी टेंभू म्हणजे दिवास्वप्न असल्याच्या तत्कालीन आमदार सदाशिवराव पाटील यांच्या वक्तव्याने संपूर्ण मतदार संघात खळबळ उडाली. त्याचे राजकीय भांडवल विरोधकांनी मोठ्या प्रमाणात केले. त्यामुळे आपल्याला काय म्हणायचे होते, हे सांगण्यासाठी पाटील यांची दमछाक झाली. आता विद्यमान आमदार अनिल बाबर यांनी खानापूर तालुक्यातील एका कार्यक्रमात ‘टेंभू’च्या पाण्यात तालुक्याला बुडवून काढण्याची सुपारी घेतली नसल्याचे विधान केले. त्यामुळे आ. बाबर यांच्यावर माजी आमदार पाटील यांचे पुत्र नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी निशाणा साधत टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे या प्रकरणात विद्यमान आमदारांचीही धावपळ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे खानापूर तालुका टेंभू योजना कृती समितीची स्थापना करून जलसंधारण समितीचे स्वीकृत सदस्य अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांनी आता योजनेतील त्रुटी व नियोजनाच्या अभावाचा झेंडा खांद्यावर घेऊन रान उठविले आहे. राजकीय भांडवल बाजूला ठेवून सर्वच नेत्यांनी ‘टेंभू’च्या पूर्णत्वासाठी व दुष्काळग्रस्तांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे. राजकीय संघर्ष : आरोप-प्रत्यारोपाने करमणूक‘टेंभू’च्या योजनेवरून होत असलेल्या वार-पलटवारांमुळे दुष्काळग्रस्तांची करमणूक होत आहे. त्यामुळेच आता खानापूर व आटपाडी या दुष्काळी तालुक्यांत टेंभू योजनेचे पाणी पोहोचण्यापूर्वीच राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजकीय संघर्ष, श्रेयवाद अथवा योजनेचे राजकीय भांडवल बाजूला ठेवून सर्वच नेत्यांनी ‘टेंभू’च्या पूर्णत्वासाठी व दुष्काळग्रस्तांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याची अपेक्षा दुष्काळग्रस्त व्यक्त करीत आहेत. या योजनेवरुन पुढील राजकारण काय दिशा घेणार, याकडे लक्ष लागले आहे. बाबासाहेब मुळीक यांनी रान उठविलेखानापूर तालुका टेंभू योजना कृती समितीची स्थापना करून जलसंधारण समितीचे स्वीकृत सदस्य अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांनी आता योजनेतील त्रुटी व नियोजनाच्या अभावाचा झेंडा खांद्यावर घेऊन रान उठविले आहे. याची आता दुष्काळी भागात चर्चा सुरु झाली आहे.