शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

गणेशभक्तांच्या मदतीला धावली खाकी वर्दी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:27 IST

सांगली : कोरोनाचे वातावरण नियंत्रणात येत असल्याने यंदाच्या गणेशोत्सवात उत्साह कायम आहे. याच कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासह नागरिकांच्या ...

सांगली : कोरोनाचे वातावरण नियंत्रणात येत असल्याने यंदाच्या गणेशोत्सवात उत्साह कायम आहे. याच कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासह नागरिकांच्या सोयीसाठी शहरात ठिकठिकाणी पोलीस कार्यरत आहेत. विसर्जनावेळी अशाच कार्यरत कर्मचाऱ्याने खाकीचा रुबाब बाजूला सारत सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात दिला. आणि कर्मचाऱ्याचे काम पाहून अधीक्षक दीक्षित गेडाम यांनीही त्याच्या पाठीवर कौतुकाची धाप दिली.

गणेश विसर्जनामुळे शहरातील प्रमुख मार्गावर आणि विशेषत: नदीकाठावर मोठी गर्दी असते. अशावेळी वाहतूक नियोजनासह गर्दी होणार नाही यासाठी यंदा सर्वच ‘स्पॉट’वर विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहतूक शाखेचे कर्मचारीही त्याठिकाणी कार्यरत असतात. गुरुवारी विसर्जनाच्या सातव्या दिवशी सरकारी घाट परिसरात वाहतूक पोलीस निखिल जाधव कर्तव्यावर होते. नेमके याचवेळी एक कुटुंब दुचाकीवरून गणेशमूर्ती घेऊन विसर्जनासाठी आले. दुचाकीवर महिलेच्या हातात मूर्ती तर पुढे लहान बाळ...त्यामुळे त्या कुटुंबाची अडचण झाली. दुचाकीवरून उतरायचे तर मूर्ती सावरायला कोणीतरी हवे. आणि एकूणच गर्दीमुळे त्यांच्याकडे कोणाचे लक्षही जात नव्हते. मूर्ती हातातच असल्याने ती खाली ठेवून उतरणे धोक्याचे होते. नेमकी हीच अडचण ओळखून जाधव यांनी त्या कुटुंबाजवळ जात ती मूर्ती घेत त्यांना वाहन बाजूला लावण्यात मदत केली. शिवाय त्या कुटुंबाला सहकार्यही केले. वाहतूक पोलिसाच्या या मदतीमुळे भारावलेल्या कुटुंबाने त्यांचे विशेष आभार मानले. नियमित वाहतूक नियोजनाच्या कामाव्यतिरिक्त जाधव यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेची अधीक्षक गेडाम यांनीही दखल घेत निखिल जाधव यांचा पुष्पगुच्छ देत गौरव केला व खाकीच्या पलीकडे जाऊन केलेल्या कामाचे कौतुक केले. या वेळी वाहतूक शाखेच्या सहायक निरीक्षक प्रज्ञा देशमुख उपस्थित होत्या.