शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘आघाव’मुळे जतमध्ये ‘खाकी’ला कलंक

By admin | Updated: November 12, 2014 23:28 IST

पोलिसांची प्रतिमा सुधारा : गैर कारभार रोखण्याची गरज

जयवंत आदाटे : जत पोलीस ठाण्यातील प्रशिक्षणार्थी महिला पोलीस उपनिरीक्षक सीमा आघाव यांना चार हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्यामुळे जत पोलिसांची जनमानसातील प्रतिमा मलीन झाली आहे. पोलीस स्टेशनचा कारभार पारदर्शक करण्यासाठी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची गरज आहे.धोंडिराम महाजन रा. बिरूळ, (ता. जत) व त्यांच्या भावकीतील इतरांसोबत शेतजमीन वादातून तीन महिन्यांपूर्वी मारामारी झाली होती. यासंदर्भात परस्परविरोधी फिर्याद पोलिसात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात उपनिरीक्षक सीमा आघाव यांना लाच घेताना रंगेहात पकडले होते. सीमा आघाव यांना निलंबित करून त्यांची बदली पोलीस मुख्यालयात करण्यात आली आहे. आघाव यांचा कार्यकाल प्रशिक्षणार्थी होता, तो नुकताच पूर्ण झाला होता. परंतु त्यांची सेवा कायम करण्यात आली नव्हती. त्यांच्या कामकाजाबद्दल येथील नागरिकांच्या तक्रारी होत्या; परंतु त्या एक महिला असून प्रशिक्षणार्थी असल्यामुळे वरिष्ठ अधिकारी त्यांच्याविरोधात असलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत होते.आघाव यांच्यावर निलंबनाची कारवाई करत असताना पोलीस निरीक्षक प्रकाश कदम यांची येथून तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. येथील अतिरिक्त कार्यभार सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. एच. शेख यांच्याकडे देण्यात आला आहे. जत पोलीस ठाण्यात नागरिकांचे काम मोफत होत नाही. देवाण-घेवाण ठरल्यानंतर कामाची पूर्तता केली जात आहे. येथे कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी काही दलाल नेमले आहेत. त्यांच्यामार्फत सर्व व्यवहार पूर्ण केले जात आहेत. यामध्ये काही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. सीमा आघाव यांना निलंबित करून व प्रकाश कदम यांची बदली करून पोलीस स्टेशनची प्रतिमा स्वच्छ होणार नाही. यासाठी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची नेमणूक केली तरच पोलीस ठाण्यातील भ्रष्ट कारभार थांबणार आहे.कार्यालयाबाहेर टक्केवारीचा बाजारवरिष्ठांना बसण्यासाठी जत पोलीस स्टेशनची इमारत अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे बाहेर फिरून आर्थिक गणित जमविण्याचा प्रयत्न ते करू लागले आहेत.जत पोलीस स्टेशनकडे अधिकारी व कर्मचारी मिळून ७६ जागा मंजूर आहेत. परंतु प्रत्यक्षात ५१ जण कार्यरत असून, त्यांच्याकडे पश्चिम भागातील ७५ गावांचा कार्यभार देण्यात आला आहे, तर उमदी पोलीस स्टेशनकडे उर्वरित ५० गावांचा कार्यभार देण्यात आला आहे.