शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

‘खाकी’कडून ६७ मुले दत्तक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:32 IST

सचिन लाड । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कळत-नकळत ‘वाट’ चुकलेल्या समाजातील उपेक्षित आणि दुर्लक्षित ६७ मुलांना जिल्हा पोलीस ...

सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : कळत-नकळत ‘वाट’ चुकलेल्या समाजातील उपेक्षित आणि दुर्लक्षित ६७ मुलांना जिल्हा पोलीस दलाने गेल्या सहा महिन्यांत ‘दत्तक’ घेतले आहे. या मुलांना स्वत:च्या पायावर उभे राहून नवी ‘दिशा’ दाखविण्यासाठी सामाजिक संघटनांची मदत घेतली आहे. या मुलांचे दादुकाका भिडे निरीक्षणगृहात समुपदेशन करून, त्यांना एका इन्स्टिट्यूटमध्ये विविध कोर्सचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. १७ मुलांची पहिली ‘बॅच’ प्रशिक्षण घेऊन बाहेर पडली आहे. यातील दोन मुलांनी वयाची १८ वर्षे पूर्ण केल्याने त्यांना नोकरीही मिळाली आहे.जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी सहा महिन्यांपूर्वी उपेक्षित आणि दुर्लक्षित मुलांना दत्तक घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमास ‘दिशा’ हे नाव देण्यात आले आहे. यामध्ये ‘स्नेहालय फौंडेशन’ व ‘खाकी प्रेस इंडिया’ या दोन सामाजिक संघटनांना सहभागी करून घेण्यात आले आहे. पोलीस दलातील ‘टीम’ व संघटनांचे पदाधिकारी धनंजय आरवाडे, प्रशांत पाटील, अ‍ॅड. मुक्ता दुबे यांनी संयुक्तपणे सांगली, मिरजेतील अहिल्यानगर, वाल्मिकी आवास, इंदिरानगर झोपडपट्टी, संजयनगर, ख्वाजा वसाहत याठिकाणी उपेक्षित व दुर्लक्षित मुलांचा शोध घेतला. या मुलांची तसेच त्यांच्या पालकांची घरी जाऊन भेट घेतली. ‘दिशा’ उपक्रमाची माहिती त्यांना दिली. ५० मुले या उपक्रमात सहभागी होण्यास तयार झाली. १४ ते १७ वयोगटातील ही मुले होती. या मुलांना कर्मवीर चौकातील दादुकाका भिडे निरीक्षण गृहात आणण्यात आले. तिथे निरीक्षण गृहातील मिलिंद कुलकर्णी यांच्यासह धनंजय आरवाडे व अ‍ॅड. मुक्ता दुबे यांनी मुलांचे समुपदेशन केले. मुलांचा शोध घेऊन समुपदेशन करण्यात तीन महिन्यांचा कालावधी गेला. ५० पैकी २५ मुले समुपदेशनानंतर विविध कोर्सचे प्रशिक्षण घेण्यास तयार झाली. त्यांना एका इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले. एमएससीआयटी, हार्डवेअर, ड्रायव्हिंग, सॉप्टवेअर, मोबाईल दुरुस्ती आदी कोर्सचे प्रशिक्षण देण्यात आले. यातील १७ मुले प्रशिक्षण घेऊन तयार झाली. यातील दोन मुलांना १८ वर्षे पूर्ण झाल्याने त्यांंना तातडीने नोकरीही मिळवून दिली आहे. १७ मुलांची ही बॅच यशस्वी झाल्यानंतर पोलिसांनी आणखी काही मुलांचा शोध घेण्याचे काम हाती घेतले आले.अनाथ मुलेही दत्तक घेणार...सांगली, मिरजेत अनाथालयात प्रचंड मुले आहेत. या मुलांनाही ‘दिशा’ उपक्रमात सहभागी करून घेण्याबाबत पोलीसप्रमुख सुहेल शर्मा व अतिरिक्त पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी निर्णय घेतला आहे. यासाठी अनाथालय व्यवस्थापनाशी चर्चाही करण्यात आली आहे. व्यवस्थापनानेही यास तयारी दर्शविली आहे. येत्या महिन्याभरात अनाथालयातील १५ मुलांची पहिली बॅच प्रशिक्षणासाठी रवाना करण्यात येणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, तसेच सर्वसामान्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडत पोलिसांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. राज्यात प्रथमच सांगलीत पोलिसांनी हा उपक्रम सुरू केला आहे.व्यवसायाची दिली संधी : मुलांना नोकरी किंवा त्यांना व्यवसायाची संधी, या दोन्ही गोष्टींच्या अनुषंगाने हा उपक्रम सुरू आहे. जिल्हा परिषद व जिल्हा उद्योग भवन यांच्याकडील शासकीय योजना तसेच व्यवसायासाठी लागणाऱ्या कर्जाची माहिती घेण्यात आली आहे. या दोन्ही विभागांकडून मुलांना मदत मिळवून दिली जाणार आहे.