शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

कवठेएकंद सरपंचपदी शरद लगारे बिनविरोध

By admin | Updated: September 9, 2014 23:48 IST

‘शेकाप’ची सरशी : पहिल्यांदाच मिळाली विरोधकांना संधी

कवठेएकंद : कवठेएकंद (ता. तासगाव) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाच्या शरद बाबूराव लगारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत इतिहासात प्रथमच सत्ता असतानाही विरोधी बाकावरील सदस्यांना सरपंचपदाची संधी मिळण्याची किमया घडली.ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या नऊ आणि शेतकरी कामगार पक्षाच्या आठ जागा अशी अटीतटीची निवडणूक झाली होती. परंतु लोकसभा निवडणुकीनंतर संजयकाका गटातील सरपंच दीपक जाधव यांच्या पदबदलाच्या घडामोडींनंतर राजीनामा दिल्याने सरपंचपद रिक्त होते. त्याजागी राष्ट्रवादीने शेकापला संधी देऊन, सरपंचपदापासून अलिप्त राहण्याची भूमिका घेतली.एक वर्षाची मुदत राहिली असतानाही शेकापने सरपंचपदाची सूत्रे सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली. यामध्ये शेकापकडून तीन सदस्यांनी अर्ज भरले होते. शरद लगारे यांना सरपंचपदाची संधी देऊन त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.त्यावेळी मंडल अधिकारी यु. डी. कांबळे, तलाठी राहुल कोळी, ग्रामविकास अधिकारी टी. पी. जाधव, पोलीसपाटील किसनराव जाधव, तंटामुक्तीचे अध्यक्ष शंकरराव माळी यांनी निवडणूक प्रक्रियेचे काम पाहिले. शेकापला संधी देण्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतली होती. सकाळपासूनच ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांची गर्दी होती. निवडीनंतर शेकापच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. भाई शंकरराव माळी, सूर्यकांत पाटील, विठ्ठल कुंभार, विजय पाटील, प्रा. बाबूराव लगारे, विनोद कुलकर्णी, वसंतराव तपासे, नामदेव गुरव उपस्थित होते. (वार्ताहर)राष्ट्रवादी तटस्थराष्ट्रवादीकडे नऊ, तर शेकापकडे आठ जागा होत्या.परंतु लोकसभा निवडणुकीनंतर खासदार गटाच्या दीपक जाधव यांनी राजीनामा दिला होता. या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीने तटस्थ भूमिका घेतली.