शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

काेकळे-करलहट्टी रस्त्याची वाताहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:25 IST

कवठेमंहाकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यात कोकळे ते करलहट्टीजाणारा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे निकामी झाला आहे. रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ता अशी ...

कवठेमंहाकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यात कोकळे ते करलहट्टीजाणारा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे निकामी झाला आहे. रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ता अशी अवस्था आहे. या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे त्वरित या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून हाेत आहे.

कोकळे ते करलहट्टी रस्ता पुढे कर्नाटक हद्दीला जोडला जाताे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. दुरवस्था झालेल्या या रस्त्यावर अनेकदा छोटे-मोठे अपघात होत असल्याने प्रवासी संतप्त आहेत. करलहट्टीतील लोकांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी करलहट्टी ते कोकळे हा रस्ता सोयीचा मानला जातो. गावांमध्ये दवाखाना व माध्यमिक विद्यालय, बँक व इतर सुविधा नसल्याने ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, महिला, प्रवासी व विद्यार्थी या रस्त्याने नेहमी ये-जा करीत असतात. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे करलहट्टी व वाडी वस्तीवरील नागरिकांना येथून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागते. रस्ता अत्यंत खराब असल्याने वेळेत पोहोचता येत नाही. अनेकदा वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण होतो. करलहट्टी गावाकडे येण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याने हा रस्ता येथील नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने गरजेचा आहे. या रस्त्याला अनेक दिवसांपासून खड्ड्याचे ग्रहण लागल्याने प्रवासात संताप व्यक्त होत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या रस्त्याचे काम मार्गी लावावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

गावामध्ये येणारी बसही खराब रस्त्यामूळे बंद करण्यात आली आहे. तरी लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाने या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी या भागातील प्रवासी व नागरिकांमधून हाेत आहे.

चौकट

आंदाेलनाचा इशारा

कवठेमहांकाळ तालुक्यातील कोकळे ते करलहट्टीकडे जाणारा रस्ता खड्ड्यांनी व्यापला आहे. लहान-मोठे अपघात सातत्याने घडत आहेत. त्यामुळे तत्काळ हा रस्ता दुरुस्ती करण्यात यावा, अन्यथा करलहट्टी ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करू, असा इशारा ग्रामपंचायत सदस्य सखाराम ओलेकर, दत्तात्रय ओलेकर, आकाराम आटपाडकर, सागर बेडगे, शिवाजी इरकर, विठ्ठल पांढरे, संतोष ओलेकर, संभाजी बेडगे मेजर श्रीरंग ओलेकर, कोंडीबा इरकर यांनी दिला आहे.