शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

चिल्ड्रन पार्कवरून भाजपच्या नगरसेविकांमध्ये जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:27 IST

सांगली : शहरात उभारण्यात येणाऱ्या चिल्ड्रन पार्कसह जिल्हा नियोजन समितीच्या सात कोटी रुपयांच्या कामावरून भाजपच्या महिला व बाल कल्याण ...

सांगली : शहरात उभारण्यात येणाऱ्या चिल्ड्रन पार्कसह जिल्हा नियोजन समितीच्या सात कोटी रुपयांच्या कामावरून भाजपच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती गीतांजली ढोपे-पाटील व माजी महापौर गीता सुतार यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. त्यातच या समितीला अडीच वर्षांपासून निधी मिळाला नसल्याने सर्वपक्षीय महिला सदस्यांनी ही समितीच बरखास्त करण्याची संतप्त मागणी केली.

महापालिकेची ऑनलाईन महासभा बुधवारी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महिला व बाल कल्याण समितीसाठी शासनाकडून महिला व बाल विकास अधिकारी नेमण्याचा प्रस्ताव सभेत आला. याला एकमताने मंजुरी देण्यात आली; मात्र या विषयावरील चर्चेत सहभाग घेताना सर्वपक्षीय महिला सदस्यांनी या समितीच्या कारभाराचा पंचनामा केला. माजी महापौर सुतार या आक्रमक होत म्हणाल्या, समितीचा गेल्या दोन वर्षांतील ५ टक्के निधी कुठे गेला? या समितीतील सदस्यांचे आजपर्यंत एक रुपयाचेही काम झालेले नाही. दोन लाखांचे काम होत असताना या समितीचा ९० लाख रुपयांचा निधी चिल्ड्रन पार्कसाठी खर्च करण्याचे कारण काय, असे प्रश्न उपस्थित केले. यावर सभापती गीतांजली ढोपे-पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सात कोटींच्या निधीप्रश्नी गीता सुतार यांनी आमच्यावर अन्याय केल्याचा आरोप केला. यावरून या दोन्ही भाजप नगरसेविकांत जुंपली.

महिला सदस्यांची कामे होत नसतील तर ही समितीच हवी कशाला? तिला टाळे टोका, अशी मागणी सुतार यांनी केली. शुभांगी साळुंखे म्हणाल्या की, समितीची कामे होत नसतील तर हा आमचा अपमान आहे. यापेक्षा समितीच बरखास्त करा. भारती दिगडे यांनी या समितीतील निधीच्या खर्चाची श्‍वेतपत्रिका काढावी, अशी मागणी केली. आनंदा देवमाने म्हणाले, ही समिती बरखास्त करा. अनारकली कुरणे, शेखर इनामदार, जगन्नाथ ठोकळे, शुभांगी साळुंखे, संगीता खोत, नर्गिस सय्यद, मैनुद्दीन बागवान, स्वाती शिंदे यांनी महिला समितीवर अन्याय होत असल्याचे मत मांडले.

आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले, महिला व बाल कल्याण समितीसाठी एकूण बजेटच्या नव्हे तर महसुली जमेच्या पाच टक्के निधी राखीव आहे. या निधीतून गेल्या वर्षी रुग्णवाहिका खरेदी करण्यात आली. कोरोना काळात तिचा मोठा उपयोग होत आहे.

चौकट

आयुक्तांची राजकीय टिपणीवरून नाराजी

राजकीय टिपणी होत असल्याने आयुक्त नितीन कापडणीस नाराज झाले. ते म्हणाले की, शहराच्या विकासासाठी नवीन संकल्पना राबवायच्या नाहीत का? सांगली जिल्ह्याचे ठिकाण आहे. येथे येणाऱ्या नागरिकांना व लहान मुलांना एखादे चांगले पर्यटन स्थळ असावे, या हेतूने पार्कचा निर्णय घेतला. याचा ठेकेदार कोण, ते कोणाच्या वॉर्डात आहे, याच्याशी माझा संबंध नाही. चिल्ड्रन पार्कचे आरक्षण असलेली एक एकर जागा उपलब्ध असल्याने तेथे तो करण्याचा निर्णय घेतला आहे. याला विरोध असेल तर महासभेने हा विषय रद्द करावा.