शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीचे बनावट नेमणूक पत्र

By admin | Updated: December 10, 2015 00:55 IST

एकास अटक : जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बोगस लेटरपॅड

जत : सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी लावतो, असे आमिष दाखवून व जिल्हाधिकारी यांच्या नावाचे बनावट लेटरपॅड व सही-शिक्का वापरून खोटे नेमणूक पत्र दिल्याच्या आरोपावरून राहुल बंडा टिंगरे (वय ३१, रा. बुधगाव, ता. मिरज) याला जत पोलिसांनी अटक केली. त्याला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. टी. इंगळे यांच्यासमोर उभे केले असता, दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.समीर नजीर चट्टरगी (३४) यांना जिल्हाधिकारी कार्यालयात शिपाई पदावर व त्यांची पत्नी रोशन चट्टरगी (३०, रा. दोघे हुजरे गल्ली, जत) यांना टायपिस्टची नोकरी लावतो, असे आमिष दाखवून त्यांच्याकडून आगाऊ रक्कम म्हणून एक लाख रुपयांचा धनादेश २८ जानेवारी २०१५ रोजी जत येथे घेतला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या लेटरपॅडवर बनावट सही-शिक्का करून त्यांना नेमणूक पत्र दिले होते. या प्रकरणात विजय हणमंत जाधव (४०, रा. गावभाग, सांगली) व राहुल टिंगरे या दोघांचा सहभाग होता. यापैकी पोलिसांनी विजय जाधव यास अटक करून त्याच्याविरोधात कारवाई केली आहे. सध्या तो न्यायालयातून जामिनावर सुटून बाहेर आला आहे. ही घटना घडल्यानंतर राहुल टिंगरे फरार झाला होता. पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे आणि त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी टिंगरे यास आठ जानेवारीला बुधगाव येथून अटक करून, बुधवारी जत येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. टी. इंगळे यांच्यासमोर उभे केले असता, त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.याप्रकरणी समीर नजीर चट्टरगी यांनी विजय जाधव व राहुल टिंगरे यांच्याविरोधात जत पोलिसात फसवणूक केल्याची फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी पुढील कारवाई केली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत. (वार्ताहर) लाखाचा आगाऊ धनादेश विजय जाधव व राहुल टिंगरे याने समीर व त्याची पत्नी रोशन यांच्याकडून एक लाख रुपयांचा आगाऊ धनादेश घेतल्यानंतर त्यांना इंग्रजी व मराठी भाषेतील बनावट लेटरपॅडवर बनावट सही-शिक्का करून नेमणूक पत्र दिले होते. हा दस्तऐवज खरा आहे, असे भासविण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी कोणापुढेही काही बोलू नये, अशी भीती त्यांना घालण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी कोठेही वाच्यता केली नाही. परंतु कालांतराने त्यांचा कारनामा बाहेर पडल्यानंतर त्यांनी त्यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे.