शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

जयंत पाटील यांनी माळरानाचे नंदनवन केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:19 IST

फोटो: आष्टा येथे पाच आंबा सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या ट्रान्सफार्मर उद्घाटनप्रसंगी प्रतीक पाटील विराज शिंदे, माणिक शेळके, संग्राम फडतरे, दिलीप ...

फोटो: आष्टा येथे पाच आंबा सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या ट्रान्सफार्मर उद्घाटनप्रसंगी प्रतीक पाटील विराज शिंदे, माणिक शेळके, संग्राम फडतरे, दिलीप वग्यानी, रघुनाथ जाधव, अर्जुन माने, गुरुनाथ कुलकर्णी आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : लोकनेते राजारामबापू पाटील यांनी वाळवा तालुक्यातील जमीन ओलिताखाली आणली. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून तालुक्यातील माळरानाचे नंदनवन केले. महालक्ष्मी व पाचआंबा पाणीपुरवठा संस्थेमुळे आष्टा परिसरातील शेतकऱ्यांची शेती ‘सुजलाम सुफलाम झाली आहे', असे प्रतिपादन युवक नेते प्रतीक जयंत पाटील यांनी केले.

आष्टा येथील पाचंअंबा सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या नवीन ट्रान्सफार्मरचे उद्घाटन प्रतीक पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी पाटील बोलत होते. राजाराम बापू साखर कारखान्याचे संचालक विराज शिंदे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप वग्यानी, राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक माणिक शेळके, राजारामबापू दूध संघाचे संग्राम फडतरे, राजारामबापू पतसंस्थेचे रघुनाथ जाधव, नगरसेवक अर्जुन माने , दीपक मेथे, भीमराव मस्के, व्यवस्थापक गुरुनाथ कुलकर्णी उपस्थित होते.

माणिक शेळके म्हणाले, संस्थेचे कार्यक्षेत्र १५०० एकर व १२६० एकर तारण क्षेत्र आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचा विकास साधला आहे.