शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात जवान ठार

By admin | Updated: January 17, 2016 00:35 IST

आगळगावजवळ घटना : अज्ञात वाहनाची धडक

 ढालगाव : मिरज-पंढरपूर राज्यमार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथील जवान नंदकुमार रामचंद्र पाटील (वय ३५) जागीच ठार झाले. शुक्रवारी रात्री आगळगाव फाट्यानजीक हा अपघात झाला. लष्करात जवान असलेले नंदकुमार पाटील १० जानेवारी रोजी एक महिन्याच्या सुटीसाठी गावी आले होते. शुक्रवारी रात्री ते शिरढोण येथे आलेल्या पाचेगाव (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथील मित्राला सोडण्यासाठी बाहेर पडले. जेवण करून मित्राला पाचेगावला सोडून ते रात्री शिरढोणकडे परतत होते. रात्री अकरा वाजता त्यांनी घरी दूरध्वनी करून काही वेळात शिरढोणमध्ये पोहोचत असल्याचे सांगितले, मात्र उशिरापर्यंत ते न आल्याने नातेवाईकांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा फोन बंद होता. सकाळी नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली असता, आगळगाव फाट्यावर झालेल्या अपघाताची माहिती मिळाली. त्या अपघातातील मृत नंदकुमार पाटील असल्याचे स्पष्ट झाले. (वार्ताहर) शिरढोणवर शोककळा नंदकुमार पाटील यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच शिरढोण परिसरावर शोककळा पसरली. सामाजिक उपक्रमात ते अग्रभागी असत. नंदकुमार यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. अपघाताची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात झाली आहे.