शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

जत तालुका दूध संघास नाेंदणी प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:17 IST

जत : जत तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय्य व योग्य दर मिळवून देण्यासाठी जत तालुका दूध संघाची स्थापना केली ...

जत : जत तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय्य व योग्य दर मिळवून देण्यासाठी जत तालुका दूध संघाची स्थापना केली आहे. त्याला शासनाकडून नोंदणी प्रमाणपत्रही मिळाले आहे. येत्या २१ फेब्रुवारीला तिप्पेहळ्ळी (ता. जत) येथे दूध संकलन केंद्र व चीलिंग सेंटर सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार विक्रम सावंत यांनी पत्रकार बैठकीत दिली.

सावंत म्हणाले. सन १९८५ पासून जत तालुका दूध संघ स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू होते, परंतु त्याला गती आली नव्हती. तालुका भौगोलिक विस्ताराने मोठा असूनही तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर व न्याय मिळत नव्हता. त्यामुळे आम्ही जत तालुका दूध संघ स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करून त्याला मान्यता मिळवून घेतली आहे. या दूध संघात २१ जणांचे संचालक मंडळ असून तालुक्याच्या विविध भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. या दूध संघाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना सवलती व शासकीय योजनेचा फायदा मिळवून देऊन जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न आहे. २१ फेब्रुवारील प्राथमिक स्वरूपात दूध संकलन सुरू करण्यात येणार आहे. दररोज सरासरी दहा हजार लिटर दूध संकलन होईल.

दूध संघाच्या माध्यमातून तालुक्यातील सुमारे ५० तरुण बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. तालुक्यातील प्रत्येक गावातील सहकारी संस्था व दूध संकलन केंद्र यांच्याशी संलग्न राहून तेथील दूध तालुका दूध संघाकडून संकलित करण्याचा प्रयत्न आहे. दूध संघाचे कार्यक्षेत्र जत तालुका मर्यादित स्वरूपात राहणार असून येथे संकलित झालेले दूध (पुणे) किंवा जर्सी डेअरी (हैदराबाद) येथे पुरविण्याबाबत प्राथमिक चर्चा सुरू आहे. तालुका दूध संघ संचालक मंडळाच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल.

यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आप्पाराया बिराजदार, दूध संघाचे उपाध्यक्ष महादेव दुधाळ-पाटील, सचिव ॲड. युवराज निकम, संचालक अतुल मोरे, गणेश गिड्डे उपस्थित होते.