शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जत तालुका दूध संघ राजकारणविरहित राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जत : दानम्मादेवी जत तालुका शेतकरी दूध संघ दुष्काळी भागातील दूध उत्पादक शेतकरी व दूध सोसायट्यांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जत : दानम्मादेवी जत तालुका शेतकरी दूध संघ दुष्काळी भागातील दूध उत्पादक शेतकरी व दूध सोसायट्यांना वरदान ठरणारा आहे. गटा-तटाचे राजकारण व मतभेद बाजूला ठेवून भविष्यात या दूध संघाची वाटचाल होईल, असा आत्मविश्वास आमदार विक्रम सावंत यांनी व्यक्त केला. दूध संघाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

नव्यानेच सुरू होत असलेला दूध संघ कोणाच्याही खासगी मालकीचा नाही. तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सहकारी तत्त्वावर संघ स्थापन करण्यात आला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला शासन दरानुसार हमीभाव मिळत नसल्याची तक्रार होती. तालुका पातळीवरील दूध संघ नसल्याने शेतकऱ्यांना गैरसोयींचा सामना करावा लागत होता. यापुढील कालावधित कोणत्याही गैरसोयीचा सामना दूध उत्पादक शेतकरी व संस्थांना सहन करावा लागणार नाही, अशी ग्वाही आमदार विक्रम सावंत यांनी दिली.

तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आप्पाराया बिराजदार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी अरुण चौगुले, वरिष्ठ लेखाधिकारी उच्च शिक्षण कोल्हापूर रणजित झपाटे, सहायक निबंधक सहकारी संस्था बाळासाहेब पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. बी. जवणे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी जि. प. सदस्य महादेव पाटील, मल्लेश कत्ती, सुजय शिंदे, ॲड. युवराज निकम, गणेश गिड्डे, अतुल मोरे, नाथा पाटील, रवींद्र शिंदे, काका शिंदे आदी उपस्थित होते. बाबासाहेब कोडग यांनी आभार मानले.