शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

जगन्नाथ ठोकळे यांना उपमहापौरपदी संधी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:23 IST

संजयनगर : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची भाजपसोबत युती आहे. गत ...

संजयनगर : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची भाजपसोबत युती आहे. गत निवडणुकीत रिपाइंचे जगन्नाथ ठोकळे हे भाजपच्या चिन्हावर निवडून आले. आगामी उपमहापाैर निवडीवेळी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांना संधी मिळावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षातर्फे करण्यात आली आहे. याबाबत नगरसेवक विवेक कांबळे, सांगली जिल्हा अध्यक्ष संजय कांबळे व महिला आघाडी सांगली जिल्हा अध्यक्ष छाया सर्वेदे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना निवेदन दिले आहेत.

नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतून गोरगरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रभागांमध्ये कोट्यवधींचे निधी आणून विविध विकासकामे सुरू केले आहे. काम करणाऱ्या व्यक्तीला मनपामध्ये पदे मिळणे अपेक्षित आहे. रिपब्लिकन पक्षाला गेल्या अडीच वर्षांमध्ये महानगरपालिकेत कोणतेही मानाचे स्थान मिळाले नाही. यावेळी उपमहापौर पद दिले तर जिल्ह्यामध्ये परिवर्तनाचे वादळ निर्माण होणार आहे. जगन्नाथ ठोकळे यांना संधी देऊन भारतीय जनता पक्षच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध होईल, असे निवेदनात म्हटले आहे.

फोटो-१४दुपटे४

फोटो ओळी : नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांना उपमहापौरांची संधी द्यावी या मागणीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आरपीआयच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी विवेक कांबळे, संजय कांबळे, जगन्नाथ ठोकळे, शेखर इनामदार उपस्थित होते.