शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूर बाजार समितीची हवा थंड!

By admin | Updated: June 30, 2015 00:15 IST

संचालक पदासाठी फिल्डिंग : जयंत पाटील यांना साकडे; विरोधी गट मात्र शांतच

अशोक पाटील - इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ३० जुलैरोजी होत आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीतून ५८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यातील ५६ अर्ज वैध ठरले आहेत. संचालकपद मिळण्यासाठी उमेदवार माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांना भेटून साकडे घालत आहेत. परंतु जयंत पाटील हे मात्र, ‘अजून बराच कालावधी आहे, बघूया परत’, असे उत्तर देत आहेत. विरोधी गटाकडूनही ठोस असा विरोध होत नसल्याने निवडणुकीची हवा थंडच आहे.बाजार समितीच्या निवडणुकीत जयंत पाटील यांचे समर्थक मोठ्या ताकदीनिशी उतरले आहेत. यातील ५६ जणांचे अर्ज वैध ठरले आहेत, तर त्यांच्याविरोधात नानासाहेब महाडिक समर्थक, काँग्रेस आणि शिवसेनेने आपले उमेदवार दिले आहेत. तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी विरोधक एकत्र येण्याची भाषा करत असले तरी, नेतृत्व कोणाकडे द्यायचे, हा प्रश्न आहे.राष्ट्रवादीच्यावतीने उमेदवारी मिळावी, यासाठी उमेदवार आपले कार्यकर्ते घेऊन आमदार जयंत पाटील यांची भेट घेऊन साकडे घालताना दिसत आहेत. परंतु उमेदवार ठरविण्याची अंतिम तारीख १४ जुलै असल्याने जयंत पाटील यांनी अद्यापही या निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले नाही. अजून वेळ आहे, बघू, अशीच उत्तरे भेटणाऱ्या उमेदवारांना ते देत आहेत.काँग्रेससह पूर्वाश्रमीच्या काँग्रेसच्या महाडिक गटानेही वेगळे अर्ज दाखल केले आहेत. शिवसेनेचे आनंदराव पवार यांच्याही समर्थकांनी अर्ज दाखल करुन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक भाजप नेते मात्र या निवडणुकीपासून दूर राहिले आहेत, तर पवार पार्टीचे वैभव पवार आणि त्यांचे बंधू विजय पवार यांनी राष्ट्रवादीला ‘टार्गेट’ करून त्यांच्या उमेदवारांविरोधात तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे.निवडणुकीतील चित्र स्पष्ट होण्यासाठी १४ जुलैची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे सध्या तरी निवडणुकीची हवा थंड असल्याचेच चित्र आहे.