शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात भरदिवसा ठेकेदाराला १७ हजारांला लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:16 IST

इस्लामपूर : इस्लामपूर-पेठ रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहासमोरील रस्त्यावर चहाच्या टपरीवर थांबलेल्या ठेकेदारास चाकूचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी देत दोघा ...

इस्लामपूर : इस्लामपूर-पेठ रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहासमोरील रस्त्यावर चहाच्या टपरीवर थांबलेल्या ठेकेदारास चाकूचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी देत दोघा लुटारूंनी त्याच्या खिशातील १७ हजार रुपयांची रोकड लुटली. यातील एका लुटारूस नागरिकांच्या मदतीने पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आले. गुरुवारी दुपारी तीनच्यासुमारास ही घटना घडली.

याबाबत युनूस जमिरअहमद खान (वय ३२, मूळ रा. उरौलीया, जि. बदायु-उत्तरप्रदेश, सध्या-श्रीपादनगर,

इस्लामपूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. बबन भगवान वाघमोडे असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याचा दुसरा साथीदार पळून गेला आहे. खान हा मजूर पुरवण्याचे ठेके घेतो. गेल्या आठ वर्षांपासून तो शहरात कुटुंबासह रहात आहे. आज दुपारी तो इस्लामपूरच्या औद्योगिक वसाहतीमधील काम आटोपून दुचाकीवरून नेर्लेकडे जात होता. यावेळी त्याच्यासोबत छुटन अच्छन खान आणि बाबू खान हे मजूर होते. पेठ रस्त्यावर शासकीय विश्रामगृह परिसरात आल्यावर चहा पिण्यासाठी थांबले. तेथे बाजूच्या गॅरेजमध्ये बसलेल्या दोघांनी युनूस खान याला सिगारेट मागितली. त्याने दोघांना सिगारेट दिली. याचवेळी बबन वाघमोडे याने त्याच्या गळ्याला चाकू लावून तुझ्याकडील असणारे पैसे दे, नाही तर तुला जिवंत ठेवणार नाही, असे म्हणून त्याच्याशी झटापट करत खिशातील १७ हजारांची रोकड जबरदस्तीने काढून घेत साथीदाराकडे दिली. यावेळी खान याने आरडाओरडा केल्यावर लोक जमले. त्यांनी बबन याला पकडून ठेवले, तोपर्यंत पैसे घेऊन त्याचा साथीदार पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक डी. पी. शेडगे अधिक तपास करत आहेत.