शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराज्य चोरट्यांनी दिली पाच चोऱ्यांची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:31 IST

इस्लामपूर : शहरातील बसस्थानकाच्या पश्चिमेस असणाऱ्या युनियन बँकेच्या बाहेरून ६० हजार रुपयांची रोकड पळविणाऱ्या दोघा चोरट्यांनी सांगली आणि कोल्हापूर ...

इस्लामपूर : शहरातील बसस्थानकाच्या पश्चिमेस असणाऱ्या युनियन बँकेच्या बाहेरून ६० हजार रुपयांची रोकड पळविणाऱ्या दोघा चोरट्यांनी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पाच चोऱ्यांची कबुली दिली आहे. इस्लामपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तब्बल पाच दिवस या आंतरराज्य टोळीचा माग काढत त्यातील दोघांना अटक केली आहे.

अजय बाबू जाधव (वय २१) आणि चंद्रू रामू भुई (३०, दोघे रा. अंबरनाथ, ठाणे) अशी या चोरट्यांची नावे आहेत. हे दोघेही अत्यंत धुर्त असून, आपला नेमका ठावठिकाणा ते अद्याप दडवून ठेवत आहेत. हे दोघे मूळचे कर्नाटक किंवा आंध्रप्रदेशातील असावेत, असा पोलिसांचा संशय आहे.

या दोघांनी इस्लामपूर, शिराळा, इचलकरंजी, कोल्हापूर-शाहूपुरी आणि गडहिंग्लज येथे चोऱ्या केल्याची कबुली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला दिली आहे. या दोघांनी शहरातील युनियन बँकेच्या परिसरातून एका निवृत्त वृद्ध आणि त्यांच्या मुलीला चकवा देत त्यांच्याकडील ६० हजार रुपयांची रोकड असणारी पिशवी पळवून दुचाकीवरून पोबारा केला होता.

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत या चोरट्यांचा माग काढण्यासाठी तब्बल पाच दिवस खर्ची घातले होते. अखेर या दोघांना कागल (कोल्हापूर) येथून पळून जाताना बसस्थानकावर जेरबंद करण्यात आले होते. सध्या हे दोघे पोलीस कोठडीत आहेत. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अरुण पाटील अधिक तपास करीत आहेत.