शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

शिराळ्यातील ग्रामपंचायतींना आजपासून इंटरनेट सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:25 IST

कोकरुड : गेल्या तीन वर्षांपासून परवानगीसाठी रखडलेली आणि सेवा देण्यावरुन दोन कंपन्यांच्या वादात अडकलेल्या शिराळा तालुक्यातील इंटरनेट सेवेला ...

कोकरुड : गेल्या तीन वर्षांपासून परवानगीसाठी रखडलेली आणि सेवा देण्यावरुन दोन कंपन्यांच्या वादात अडकलेल्या शिराळा तालुक्यातील इंटरनेट सेवेला १ मे रोजी महाराष्ट्र दिनापासून सुरुवात होत आहे. शिराळा तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींना आता दररोज ३४ जीबी नेट वापरता येणार असून, ऑनलाईन कामे करण्यासाठी याचा मोठा लाभ ग्रामपंचायतींना होणार आहे.

केंद्र सरकारने चार वर्षांपूर्वी सर्व खेडी इंटरनेटने जोडण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. या घोषणेनंतर एक वर्षानी केंद्र सरकारतर्फे प्रत्येक ग्रामपंचायतीत नेटचे किटही बसविण्यात आले होते. मात्र, ही सेवा कोणी द्यायची आणि आकारणी कुणी करायची, यावरुन भारतीय दूरसंचार विभाग व बीबीएनएल यांच्यात वाद निर्माण झाल्याने तीन वर्षांपासून इंटरनेट सेवाच सुरु झाली नाही. उलट लाखो रुपयांचे साहित्य ग्रामपंचायतीच्या कोपऱ्यात अडकून पडले होते.

अखेर बीएसएनएल आणि बीबीएनएल यांच्यात एकमत झाल्याने शिराळा तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींपैकी ८०हून अधिक ग्रामपंचायतींमध्ये कॉमन सर्व्हिस सेंटर-ई गव्हर्नर या दिल्लीच्या कंपनीने इंटरनेट सुविधा सुरु केली आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध होणार असून, प्रत्येक ग्रामपंचायतीला दररोज ३४ जीबी नेट वापरता येणार आहे.

कोट

उच्च प्रतीची इंटरनेट सेवा उपलब्ध नसल्याने सर्व ऑनलाईन कामे करण्यात अडथळे येत होते. इंटरनेट सेवा चांगली मिळाल्यास कामे वेळेत होऊन मार्गी लागतील. - सतीश पाटील, ग्रामसेवक, येळापूर

कोट

ग्रामपंचायतीत उत्तम दर्जाची इंटरनेट सुविधा मिळाल्यास ग्रामपंचायत, तलाठी, आरोग्य, शिक्षण विभागाची कामे वेळेत होऊन याचा लोकांना फायदा होईल. तसेच ग्रामपंचायतीमार्फत अनेक सोयी-सुविधा करण्यास फायदा ठरेल. - विजय पाटील, सरपंच काळूद्रे.