शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

सांगली जिल्ह्यातील १२१ गावांत दूषित पाणी : ग्रामपंचायतींना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 22:48 IST

सांगली : जिल्ह्यातील पाण्याच्या २१९९ नमुन्यांपैकी १२१ गावांतील पाण्याचे १६४ नमुने दूषित आल्यामुळे तेथील ग्रामपंचायतींना पाण्याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना

ठळक मुद्देस्वच्छ पाण्याबाबत आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत मतदार विचारणार जाबराज्यमंत्री खोत दूषित पाणीप्रश्नावर तोडगा काढून गावाला स्वच्छ पाणी उपलब्ध करून देतील कासत्ताधारी आणि विरोधकांनाही मतदार दूषित पाण्याचा आता जाब विचारतील,

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील पाण्याच्या २१९९ नमुन्यांपैकी १२१ गावांतील पाण्याचे १६४ नमुने दूषित आल्यामुळे तेथील ग्रामपंचायतींना पाण्याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा परिषदेकडून दिल्या आहेत. दूषित पाणी नमुने आढळून आलेल्या बहुतांशी गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे.जिल्ह्यातील छोट्या पाणीपुरवठा योजना असणाºया ७० टक्के गावांमध्ये पाणी शुध्दीकरण केंद्राची उभारणीच केली नाही. काही गावांमध्ये पाणी शुध्दीकरण केंद्र सुरु असूनही तेथील यंत्रणा कार्यान्वित नसल्यामुळे नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.

दर महिन्याच्या तपासणीमध्ये ६० ते १२५ गावांमध्ये दूषित पाणी आढळून येत आहे. दूषित पाण्याबाबत नोटिसा देण्यापलीकडे जिल्हा परिषद प्रशासनाने काहीच केले नाही. काही गावांमध्ये तर गेल्या दोन वर्षापासून वारंवार दूषित पाण्याचे नमुने सापडत आहेत. या गावांवर जिल्हा परिषद आणि राज्य शासनाने कडक कारवाई करण्याची गरज आहे.

आॅगस्ट २०१७ मध्ये जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील दोन हजार १९९ पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यापैकी आटपाडी तालुक्यातील १७, जत ८, कवठेमहांकाळ १, मिरज ११, तासगाव १७, पलूस ३, वाळवा १९, शिराळा १७, खानापूर १३ व कडेगाव तालुक्यातील १५ गावांतील पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. यापैकी बहुतांशी गावांमध्ये पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. येथील जागृत मतदार निश्चित दूषित पाण्याबाबत उमेदवारांना जाब विचारण्याची शक्यता आहे. पाच वर्षात दूषित पाण्यावर विरोधकांनीही कधी आवाज उठविलेला नाही आणि सत्ताधाºयांनी तर त्याकडे दुर्लक्षच केल्यामुळे, नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांनाही मतदार दूषित पाण्याचा आता जाब विचारतील, असे बोलले जाते.पाणीपुरवठा मंत्र्यांच्या गावातही दूषित पाणीमरळनाथपूर (ता. वाळवा) हे पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे गाव आहे. या गावातील आॅगस्ट महिन्यातील पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. याबद्दल ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेने नोटीस बजावून, दूषित पाण्याबाबत काळजी घेण्याची सूचना दिली आहे. राज्यमंत्री खोत दूषित पाणीप्रश्नावर तोडगा काढून गावाला स्वच्छ पाणी उपलब्ध करून देतील का, असा प्रश्न आहे.दूषित पाणी नमुने आढळलेली गावे...आटपाडी तालुका : बनपुरी, आवळाई, गळवेवाडी, कामथ, घाणंद, खरसुंडी, निंबवडे, मुढेवाडी, बाळेवाडी, तळेवाडी, यपावाडी, भिंगेवाडी, लेंगरेवाडी, मासाळवाडी, हिवतड, नेलकरंजी, आटपाडी. जत तालुका : पांडोझरी, खोजानवाडी, बसर्गी, गुगवाड, उमदी, हळ्ळी, डोर्ली, बाज. कवठेमहांकाळ तालुका : आगळगाव. मिरज तालुका : तुंग, कवठेपिरान, पाटगाव, कळंबी, लिंगनूर, डोंगरवाडी, खंडेराजुरी, मल्लेवाडी, बुधगाव, बिसूर. तासगाव तालुका : वायफळे, यमगरवाडी, कौलगे, अंजनी, वडगाव, लोकरेवाडी, सावळज, चिंचणी, भैरववाडी, लोढे, वासुंबे, नागाव, शिरगाव, ढवळी, मणेराजुरी, धुळगाव, जुळेवाडी. पलूस तालुका : तुपारी, वसगडे, धनगाव. वाळवा तालुका : वाटेगाव, नेर्ले, भाटवाडी, केदारवाडी, माणिकवाडी, मरळनाथपूर, रेठरेधरण, नायकलवाडी, सुरूल, रोझावाडी, ढवळी, साखराळे, शिरगाव, पडवळवाडी, वाळवा, बावची, पोखर्णी, गोटखिंडी, नागाव. शिराळा तालुका : उपवळे, अंत्री बु., अंत्री खुर्द, देववाडी, जांभळेवाडी, मांगले, शिरसी, गिरजवडे, धामवडे, घागरेवाडी, बांबवडे, पाचुंब्री, पुनवत, कणदूर, चिखली, भाटशिरगाव. खानापूर तालुका : भाळवणी, जाधवनगर, मंगरूळ, पारे, गार्डी, घानवड, आळसंद, वाझर, भांबर्डे, वासुंबे, वलखड, वेजेगाव, भिकवडी. कडेगाव तालुका : विहापूर, कडेपूर, सोहोली, वडीयेरायबाग, कोतवडे, हिंगणगाव खुर्द, तडसर, देवराष्ट्रे, चिंचणी, रामापूर, कुंभारगाव, अंबक, सोनकिरे, उपाळे मायणी, वांगी या गावांतील पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत.