शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडून कार्यकर्ते पोसण्याचा उद्योग

By admin | Updated: May 18, 2016 00:07 IST

रघुनाथदादा पाटील : शेतकऱ्यांच्याप्रश्नी २७ रोजी पुण्यात मोर्चा

सांगली : शेतकरी दुष्काळात होरपळत आहे. सत्तेबाहेर असताना थेट शेतकऱ्यांना चारा देण्याची घोषणा करणारे हे भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर कार्यकर्त्यांना पोसण्याचे निर्णय घेत आहे, अशी टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. दुष्काळाच्या प्रश्नासह गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करा, दोन कारखान्यांतील अंतराची अट रद्द करा, यांसह अन्य मागण्यांसाठी दि. २७ मे रोजी पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस निवडणुकीत शेतकऱ्यांना उत्पादनावर ५० टक्के नफा देण्याची घोषणा करीत होते. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पशुधन जगविण्यासाठी त्यांच्या दारापर्यंत चारा पोहोच करण्याचे आश्वासन देत होते. याच नेत्यांना सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा विसर पडत आहे. शेतकऱ्यांना दिलासा देणे तर लांबच, पण, सध्या प्रत्येक कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात केले जात आहेत. उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा शेतकऱ्यांना देण्याची नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली आहे. याची अंमलबजावणी कधी करणार आहात, याचाही आंदोलनात जाब विचारला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.आंदोलनात मराठा सेवा संघ, छावा संघटना, राष्ट्रीय छावा संघटना, मराठा महासंघ, पॉप्युलर फ्रंट आॅफ इंडिया, शेतकरी कामगार पक्ष, कुरैश जमाअत, आम आदमी पार्टी, देश बचाओ आघाडीसह इतर संघटना सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)आंदोलकांच्या प्रमुख मागण्या...गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करावन्यप्राणी संरक्षण कायदा रद्द करादोन साखर कारखान्यांतील अंतराची अट रद्द कराउत्पादन खर्चावर आधारित किमती न मिळाल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला असून, त्यांना कर्जमुक्त कराबैलगाडी शर्यत बंदी उठवासर्व शेतीमालावरील निर्यात बंदी उठवाशासनाने नाफेडमार्फत त्वरित कांदा खरेदी सुरु करावी