शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

पुलांच्या देखभालीसाठी स्वतंत्र विभाग

By admin | Updated: September 20, 2016 00:04 IST

चंद्रकांतदादा पाटील : विटा-कऱ्हाड रस्त्याच्या रुंदीकरणाचा विट्यामध्ये प्रारंभ

विटा : राज्यातील पुलांची देखभाल-दुरूस्ती व उभारणीसाठी स्वतंत्र विभाग केला असून, त्यासाठी सहा विभागात सहा शाखा सुरू होत आहेत. राज्यातील सर्वच पुलांचे वर्षातून दोनवेळा सर्वेक्षण करणे हे त्या विभागाचे काम आहे. ज्या पुलांची दुरुस्ती करणे शक्य आहे, त्या पुलांची दुरुस्ती करण्यात येईल. जे वाहतुकीसाठी योग्य नाहीत, त्या पुलांची नव्याने उभारणी करण्यात येईल, असे महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी स्पष्ट केले. येथील विटा-कऱ्हाड रस्त्याच्या रूंदीकरण कामाच्या प्रारंभप्रसंगी पाटील बोलत होते. यावेळी आमदार अनिल बाबर, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, जिल्हा पोलिस प्रमुख दत्तात्रय शिंदे, प्रांताधिकारी अश्विनी जिरगे, तहसीलदार कल्पना ढवळे, मकरंद देशपांडे उपस्थित होते. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, सावित्री नदीवरील पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट झाले होते, त्यावर आम्ही आजही ठाम आहोत. राज्यात धोकादायक लहान-मोठे मिळून २० हजारहून अधिक पूल आहेत. यामधील काही पूल धोकादायक आहेत, याबाबत दुमत नाही. मात्र हे सर्वच पूल एकावेळी पाडून नव्याने बांधणे शक्य नाही. त्यासाठी मनुष्यबळही उपलब्ध नाही. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात राज्यातील धोकादायक पुलांवर रिफ्लेक्टर लावण्यात येणार असून, आठ तासांच्या शिफ्टमध्ये तीन पहारेकऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गाबाबतीत आॅगस्ट महिन्यात पुणे येथे विभागातील आमदार व अधिकाऱ्यांची बैठक झाली असून, राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरच मार्गी लागेल. विजापूर-गुहागर मार्गावरील कऱ्हाड ते विटा मार्गावरील होणाऱ्या कामाबाबत आमदार अनिल बाबर पाठपुरावा करीत आहेत. त्याबाबत लवकरच तोडगा निघेल, असेही ते म्हणाले. यावेळी अ‍ॅड. विनोद गोसावी, राजाराम गरुड, सूतगिरणीचे अध्यक्ष अमोल बाबर, माजी उपसभापती सुहास बाबर, भाजप शहराध्यक्ष नगरसेवक दिलीप आमणे, बाळासाहेब लकडे, प्रकाश बागल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धोंडीराम रास्कर, कृष्णदेव शिंदे, गणपतराव भोसले, दिलीप कीर्दत, राजू जाधव, अभिजित कदम, राजू मुल्ला, समीर कदम, सुधीर जाधव यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)मराठा क्रांती मोर्चा : सरकार सकारात्मक