शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

'‘वाढीव नळपाणी’चा बागुलबुवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2016 00:13 IST

निवडणूक डोळ्यासमोर : पाण्याचा अनुशेष भरण्यासाठी नवा बहाणा

प्रकाश वराडकर --- रत्नागिरी -गेल्या आठ वर्षांत रत्नागिरीकरांना अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा झाला असताना आता घाई-गडबडीत पाण्याचा अनुशेष भरून काढण्याचा नवा बहाणा कारभाऱ्यांना मिळाला आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर ६८ कोटींच्या वाढीव नळपाणी योजनेचा बागुलबुवा रत्नागिरीकरांसमोर उभा करण्यात आला आहे. हा बागुलबुवा खरोखरच सत्यात उतरणार की आश्वासनांचे पोतडे आणखी एका आश्वासनाने भरणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काही योजना मतांच्या आशेने लोकांच्या तोंडावर फेकल्या जातात. त्यात राजकीय गणितांची जुळवाजुळव असते, हे न समजण्याएवढी जनता आता खुळी राहिलेली नाही. सैन्य पोटावर चालते. त्यांना पोटापाण्याची रसद पुरवली नाही, तर ते लढू शकणार नाही. तसेच पाण्याच्याबाबत आहे. पाणी हे जीवन आहे. पाण्याचे महत्व वेगळे सांगण्याची गरज नाही. परंतु पाण्याचाही जीवन - मरणाचा प्रश्न गेल्या आठ वर्षांच्या काळात गंभीर बनलेला असतानाही त्या त्या वेळच्या कारभाऱ्यांना तो सोडवता आला नाही. कागदावर पाणी वाहात राहिले ते नळातून आलेच नाही. त्यामुळे अपुऱ्या पाणी समस्येला रत्नागिरीकरांना सातत्याने अनेक वर्षे तोंड द्यावे लागत आहे. त्यांच्या घरी नळाला पुरेसे पाणी आले नाही. मात्र, पाणी समस्येने त्यांच्या डोळ्यात या कारभाऱ्यांनी पाणी आणले, हे कटू सत्य आहे. गेल्या दीड महिन्यापूर्वी रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी शासनाकडे रत्नागिरीसाठी वाढीव पाणी योजनेचा प्रस्ताव दिला. गेल्या आठवड्यात वाढीव पाणी योजनेचा ठराव मंजूर करून शासनाकडे पाठवा, असा आदेश आला. महाराष्ट्र राज्य नगरोत्थान कार्यक्रमांतर्गत ६८.४० कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचा ठराव गेल्या शुक्रवारी विशेष सभेत मंजूर करून तो शासनाला पाठवण्यात आला आहे. खरेतर नगरोत्थान योजना दोन वर्षांपासून सुरू आहे. त्यावेळेपासून रत्नागिरीच्या नळपाणी योजनेच्या नूतनीकरणासाठी निधी मागण्याचा विषय सुरू होता. असे असताना गेल्या वर्षभरात केवळ चर्चाच होत राहिली. आता निवडणुकांच्या तोंडावर हा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. त्याआधी असा प्रस्ताव गेला असता तर एवढ्यात या योजनेचे नूतनीकरण पूर्णही झाले असते. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हेच त्याचे कारण असल्याचा आरोप शहरवासीय करीत आहेत. शासनाकडे पाठवलेल्या या ६८.४० कोटींच्या प्रस्तावानुसार शीळ ते साळवी स्टॉप व पानवल ते नाचणेपर्यंतच्या मुख्य जलवाहिन्या बदलल्या जाणार आहेत. या दोन्ही जलवाहिन्या गंजल्या असून जागोजागी फुटल्या आहेत. त्यातून पाणी मोठ्या प्रमाणात गळती होत असून, वाया जात आहे. शहरातील प्रत्येक प्रभागातील जलवाहिन्यांचे जुने जाळे पूर्णत: काढून त्याजागी ४ इंचापेक्षा अधिक व्यासाच्या नवीन जलवाहिन्या टाकल्या जाणार आहेत. शहरातील पाणी वितरण जाळे अमुलाग्र बदलणार आहे. शहरात जुन्या यंत्रणेनुसार ४६ ठिकाणी पाणी वितरणाचे व्हॉल्व आहेत. नवीन योजनेच्या अंमलबजावणीत शहरात केवळ १६ व्हॉल्व राहणार आहेत. या १६ ठिकाणांवरूनच संपूर्ण शहरात एकाचवेळी पाणी सोडले जाणार असून, अवघ्या चार तासांत शहरातील पाणी वितरण होणार असल्याचा दावा नगराध्यक्ष मयेकर हे करीत आहेत. रत्नागिरीकरांसमोर या वाढीव नळपाणी योजनेच्या निमित्ताने अतिशय चांगले सप्तरंगी चित्र रंगवण्यात आले आहे. परंतु या प्रस्तावाला मंजुरी कधी मिळणार व आता पावसाळा तोंडावर असल्याने व पुढे निवडणूक आचारसंहिता असल्याने वाढीव नळपाणी योजनेचे काम मंजूर झाल्यास होणार कधी, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाले आहेत. निवडणुकीआधी योजनेचे काम होणे दुरापास्तरत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीआधी वाढीव नळपाणी योजनेचे काम होणे सध्यातरी दुरापास्त आहे. विकासकामांचे श्रेय घेण्यावरून सध्या रस्सीखेच सुरू आहेच. त्याचप्रमाणे या योजनेचा मुद्दा निवडणुकीत मांडून मतांचे राजकारण होणार नाही कशावरून, अशीही चर्चा सुरू झाली आहे. एकूणच निवडणुकीच्या तोंडावर वाढीव नळपाणी योजनेचा उभा करण्यात आलेला हा बागुलबुवा स्वप्नरंजन ठरू नये, तर शहराला पाणी मिळावे, अशी नागरिकांची माफक अपेक्षा आहे. पाण्यासाठी करावी लागणारी प्रतीक्षा थांबविण्याची आशा आहे.