शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

मिरज तालुक्यातील मतदारसंघांत वाढ

By admin | Updated: September 11, 2016 00:26 IST

प्रारूप रचना : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका

मिरज : जि. प. गट व पंचायत समिती गणांच्या पुनर्रचनेत मिरज तालुक्यात एक जि. प. व दोन पंचायत समिती मतदार संघात वाढ झाल्याने राजकीय समीकरणे बदलणार आहेत. म्हैसाळ जि. प. गट स्वतंत्र अस्तित्वात असल्याने शिंदे घराण्यात चुरशीने लढत होण्याची चिन्हे आहेत. या स्वतंत्र मतदार संघाने बेडग येथील इच्छुकांना जि. प.मध्ये जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे. पंचायत समितीच्या नव्या रचनेतील वाढीव दोन मतदार संघांमुळे व अनेक गावात झालेल्या बदलामुळे विद्यमान पंचायत समिती सदस्यांना निवडणुकीसाठी नव्याने बांधणी करावी लागणार आहे. पुनर्रचनेत जि. प.चे गट ११ व पंचायत समितीचे २२ गण निर्माण झाले आहेत. तालुक्यातील पूर्वीच्या जि. प.च्या बेडग गटातून म्हैसाळ हा स्वतंत्र गट उदयास आला आहे. बेडगचा जि. प. गटात समावेश असल्याने म्हैसाळचे वर्चस्व राहिले. केदारराव शिंदे व त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अलकादेवी शिंदे निवडून आल्या. म्हैसाळकर शिंदे घराण्याच्या वर्चस्वामुळे बेडगेतील इच्छुकांना संधी मिळाली नव्हती. पुनर्रचनेत बेडग व म्हैसाळ स्वतंत्र गट अस्तित्वात आल्याने मोहनराव शिंदे कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे पुन्हा मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यांची केदारराव शिंदे गटाशी लढत होणार आहे. बेडग जि. प. मतदारसंघ स्वतंत्र राहिल्याने तेथील इच्छुकांना संधी मिळणार आहे. कठवेपिरान जि. प. गटावर विद्यमान सदस्य भीमराव माने यांचे वर्चस्व आहे. या वर्चस्वामुळे पूर्वी समाविष्ट असलेल्या समडोळीतील इच्छुकांना निवडणूक लढविण्यासाठी वाव मिळाला आहे. समडोळी गट स्वतंत्र झाल्याने तेथील इच्छुकांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. समडोळी जि. प. गटात हरिपूरचा समावेश असल्याने पंचायत समिती सदस्य अशोक मोहिते यांच्या भूमिकेवरही येथील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. पुनर्रचनेत दोन गण वाढल्याने पंचायत समितीतील सदस्यसंख्या २० वरून २२ झाली आहे. लोकसंख्येवर आधारित गणांची नावे बदलली असली तरी, तांत्रिकदृष्ट्या कवठेपिरान, इनामधामणी व नरवाड गणांची नव्याने निर्मिती झाली आहे. अनेक गावांची अदलाबदल झाल्याने पुनर्रचनेत समीकरणे बदलणार आहेत. इच्छुकांना ब्रेक लागला आहे. आरक्षण जाहीर होणार असल्याने आरक्षणात कोणाचा मतदारसंघ शाबूत राहणार, कोणाची दांडी उडणार हे स्पष्ट होणार आहे. आरक्षण सोडतीवरही समीकरणे अवलंबून असल्याने इच्छुकांचे आरक्षणाकडे लक्ष लागून आहे. (वार्ताहर)जिल्हा परिषद गट व पं. स. गणमालगाव -मालगाव, मल्लेवाडी, कवलापूर - बामणोली, कवलापूर, बुधगाव - माधवनगर, बुधगाव, क. डिग्रज- नांद्रे, कसबे डिग्रज, कवठेपिरान- दुुधगाव, कवठेपिरान, समडोळी -समडोळी, इनामधामणी, म्हैसाळ - म्हैसाळ, टाकळी, बेडग- बेडग, नरवाड, भोसे - भोसे, सोनी, एरंडोली -एरंडोली , सलगरे, आरग -आरग , खटावपंचायत समिती गणात समाविष्ट गावेखटाव : खटाव, लिंगनूर, शिपूर, संतोषवाडी, जानराववाडी, सलगरे : सलगरे, बेळंकी, चा.वाडी, पा.वाडी, कदमवाडी, डोंगरवाडी, एरंडोली : एरंडोली, खंडेराजुरी, गुंडेवाडी, व्यंकोचीवाडी, भोसे : भोसे, तानंग, कळंबी, सिध्देवाडी, सोनी : सोनी, करोली एम., कांचनपूर, पाटगाव, कानडवाडी, रसूलवाडी, सांबरवाडी, काकडवाडी, मानमोडी, टाकळी : टाकळी, बोलवाड, वड्डी, नरवाड : नरवाड, विजयनगर, शिंदेवाडी, लक्ष्मीवाडी, बेडगचा काही भाग, बेडग : बेडग, म्हैसाळ : म्हैसाळ, मालगाव : मालगाव, कवलापूर : कवलापूर, बामणोली, कसबे डिग्रज : नांद्रे, क. डिग्रज, कवठेपिरान : कवठेपिरान, दुधगाव, सावळवाडी, माळवाडी, शेरीकवठे, समडोळी : समडोळी, हरिपूर, मल्लेवाडी : मालगाव, मल्लेवाडी, कवलापूर : कवलापूर, बिसूर, बुधगाव : बुधगाव, खोतवाडी, वाजेगाव, नांद्रे : नांद्रे, मौजे डिग्रज, इनामधामणी : इनामधामणी, अंकली, बामणी, निलजी, ढवळी, दुधगाव : दुधगाव, तुंग, आरग : आरग, माधवनगर : माधवनगर, कर्नाळ.