शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक तंत्रज्ञानातून शेतीचे उत्पन्न वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:21 IST

कामेरी : शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी व युवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून राजारामबापू पाटील यांनी साखर कारखाना सुरू केला. ...

कामेरी : शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी व युवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून राजारामबापू पाटील यांनी साखर कारखाना सुरू केला. पश्चिम महाराष्ट्रातील चांगला कारखाना म्हणून त्याचा नावलौकिक आहे. आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी पाण्यात व कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत सांगली जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे नूतन अध्यक्ष युवा नेते प्रतीक जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

कामेरी (ता. वाळवा) येथे राजारामबापू पाटील कारखान्याच्यावतीने उच्चतंत्रज्ञान गटशेती व ठिबक सिंचन योजना शेतकरी परिसंवाद व ड्रोनद्वारे औषध फवारणीचे तंत्रज्ञान मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राजारामबापू ग्रुप ऑफ कंपनीचे उपाध्यक्ष सुभाष जमदाडे यांनी गट शेतीबाबत मार्गदर्शन केले.

कामेरी येडेनिपाणी पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष रणजित पाटील यांनी प्रायोगिक तत्त्वावर विठ्ठलवाडी येथे २ वर्षांपासून सुरू असणाऱ्या गटशेतीची माहिती दिली व ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी मागणी केल्यास पाणी पुरवठा योजनेद्वारे ठिबक सिंचन व शेततळे ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी कारखाना संचालक भीमराव पाटील, भगवान पाटील, सुभाष जमदाडे, छाया पाटील, सुनील पाटील, शेती अधिकारी प्रशांत पाटील, डी. एम. पाटील, संजय पाटील, विलास बाळू माने, प्रा. अनिल पाटील, तानाजी माने उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य पोपट कुंभार यांनी स्वागत केले. रवींद्र पाटील व मारुती पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो ओळी- १३०१२०२१-आयएसएलएम- कामेरी न्यूज

कामेरी येथे उच्चतंत्रज्ञान गटशेती व ठिबक सिंचन योजना शेतकरी परिसंवादात प्रतीक जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रणजित पाटील, सुभाष जमदाडे, भीमराव पाटील, छाया पाटील, सुनील पाटील, प्रशांत पाटील उपस्थित होते.