मांगले : मांगले (ता. शिराळा) येथील काळभैरव सहकारी दूध संस्थेच्या दूध संकलन केंद्राचे उद्घाटन माजी सरपंच राजेंद्र दशवंत यांच्या हस्ते झाले. यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व संस्थेचे संस्थापक सुभाष दशवंत, सरपंच मीनाताई बेंद्रे, मांगले विकास सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष विलासराव दशवंत उपस्थित होते.
दूध उत्पादकांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या हिताला प्राधान्य देणार असल्याचे सुभाष दशवंत यांनी सांगितले.
यावेळी जयवंत दशवंत, सागर दशवंत, सूरज दशवंत, पंडित निकम, सचिन कोकाटे, महादेव चरापले, रायसिंग दशवंत, शरद दशवंत,सुभाष थेरगावकर, ओमकार निकम दत्तात्रय दशवंत, बाजीराव कोकाटे, राजेंद्र चरापले, गोरख कुंभार, बाजीराव गंगधर, शिवाजी कदम उपस्थित होते.