शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

पीककर्ज वाटपाचे घोडे पुढे सरकेना!; सांगली जिल्ह्यात किती टक्के झाले वाटप.. जाणून घ्या

By अशोक डोंबाळे | Updated: February 5, 2025 18:44 IST

शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर

अशोक डोंबाळेसांगली : जिल्ह्यात गतवर्षीप्रमाणे यंदाही खरीप पीककर्ज वाटपाचे नियोजन फसले. हंगामाच्या शेवटपर्यंत ८९ टक्के पीककर्ज वाटप होऊ शकले. किमान रब्बीत तरी पीककर्ज वाटपाला गती येईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, हा हंगाम संपत आला तरी २१ टक्केच पीककर्ज वाटप झाले आहे. परिणामी, जिल्ह्यातील शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर उमटत आहे.जिल्ह्यात दरवर्षीच पीककर्ज वाटपाचे नियोजन फसते आणि याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. यंदा तर खरीप हंगामाच्या शेवटपर्यंत पीककर्ज वाटपाचा आकडा ८९ टक्क्यांवरच थांबला. खासगी आणि ग्रामीण बँकांनी तर ७० टक्केही कर्ज वाटप केले नाही. विशेष म्हणजे, जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानंतरही बँकांनी हात आखडताच घेतल्याचे पाहावयास मिळाले. ३० सप्टेंबरअखेरपर्यंत खरीप पीककर्ज वाटपाची मुदत होती. त्यानंतर १ ऑक्टोबरपासून रब्बी हंगामाकरिता शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाला प्रारंभ होतो.परंतु, बँकांनी खरीप हंगामाप्रमाणे रब्बीतही हात आखडता घेतला आहे. रब्बी हंगामसाठी एक लाख ११ हजार ३१९ खातेदारांना एक हजार २४३ कोटी एक लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. पण, प्रत्यक्षात रब्बी हंगामातील पीक काढणी सुरू झाली तरी केवळ २१ टक्केच कर्ज वाटप झाले. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांनी सर्वाधिक ४३ टक्के, तर सर्वांत कमी ४ टक्के पीककर्ज ग्रामीण बँकांनी वाटप केले आहे. खासगी बँकांनी २८ टक्के, तर सहकारी बँकांनी ८ टक्के पीक कर्ज वाटप केले आहे.

रब्बी हंगामातील पीक कर्ज वाटपखातेदार - रक्कम - टक्केवारीराष्ट्रीयीकृत बँका  - ७६२६ - १५२.६२ कोटी - ४३खासगी - १६७८ - ५३.९७ कोटी - २८ग्रामीण  - ११ - १३ लाख - ४सहकारी - ६१५९ - ५३.१३ काेटी - ८एकूण  - १५४७९ - २५९.८५ कोटी - २१

खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपखातेदार - रक्कम - टक्केवारीराष्ट्रीयीकृत बँका - २२८७४ - ४१९.२१ कोटी - ७९खासगी - ५८८५ - १७२.५४ कोटी - ५९ग्रामीण  - २०० - ३.६३ कोटी - ६३सहकारी - १२३२३३ - १०८२.२७ काेटी - १०२एकूण - १५२१९२ - १६७७.६५ कोटी - ८९

किमान पेरणीच्या तोंडावर बँकांनी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट गाठणे अपेक्षित आहे. परंतु, पेरणी पूर्ण होईपर्यंत जिल्ह्यातील २१ टक्केही शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नसल्याचा आजवरचा अनुभव आहे. परिणामी, शेतकऱ्यांवर खासगी सावकाराचे उंबरठे झिजविण्याची वेळ येते. याकडे राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. - संदीप राजोबा, कार्याध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना. 

शेतकऱ्यांनी वेळेत बँकांचे कर्ज भरले तर त्यांना तीन लाखांपर्यंत व्याज माफ आहे. पीककर्ज वेळेत भरून शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या व्याजमाफीचा लाभ घेणे गरजेेचे आहे. तसेच बँकांनीही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तातडीने पीककर्ज देण्याची गरज आहे. पीककर्ज नाकारल्यास शेतकऱ्यांनी तक्रार करावी. -विश्वास वेताळ, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीbankबँक