शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

‘भूपाळी ते भैरवी’ला सखींची उत्स्फूर्त दाद

By admin | Updated: November 9, 2014 23:27 IST

‘लोकमत’ सखी मंचचा उपक्रम : सांगलीमध्ये रंगली लोकगीतांची मैफल

सांगली : आपल्या पारंपरिक लोककलांद्वारे लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या लोकप्रिय ‘भूपाळी ते भैरवी’ या कार्यक्रमास सखी मंच सदस्यांनी भरभरून दाद दिली. ‘लोकमत’ सखी मंचच्यावतीने सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला. जिव्हाळा निर्मित, संपत कदम प्रस्तुत ‘भूपाळी ते भैरवी’ कार्यक्रमाचा हा १०६ वा प्रयोग होता. हरवत चाललेल्या लोककला, नृत्य, नाट्य या अभिनयाने खुलत गेल्या. भल्या पहाटेची भूपाळी, जात्यावर दळण दळताना गायिली जाणारी ओवी, भल्या पहाटे कुडमुड्याच्या निनादात व्हणार सांगत येणारा ‘पिंगळा’ जोशी, अठरा पिढ्यांचा इतिहास सांगणारा हेळवी, लोकसंस्कृतीचा उपासक वासुदेव, खदखदून हसवणारा बहुरूपी, अंगावर आसूड ओढणारा पोतराज, कडकलक्ष्मीवाला, नटखट गवळण, विनोदातून अध्यात्म सांगणारं भारूड, लोकनाट्यातील खुसखुशीत बतावणी, ढंगदार लावणी, मोटेवरचं गीत, नंदीबैल, कोळीनृत्य, आदिवासी नृत्य, धनगरी ओव्या, एकात्मतेची नाळ जोडणारी भैरवी आदींचे सादरीकरण झाले. या कार्यक्रमात कृष्णात पाटोळे, मिलिंद कांबळे, सिकंदर पिरजादे, नरेंद्र हराळे, बाळासाहेब गणे, महेश नवाळे, अभिजित कदम, अवधुत माने, संजय घोलप, अविनाश कोठावळे, हेमंत पवार, जयश्री जाधव, वैष्णवी जाधव, वर्षा मंत्री, वर्षा जाधव, अबोली कदम व सुमित अ‍ॅकॅडमी आदी कलाकारांचा समावेश होता. यावेळी सखी मंचच्या कमिटीच्या सदस्या जया जोशी, माया शितोळे, मीनल कुडाळकर, पद्मा मस्के, पार्थ हॉलिडेजचे मुकुंद माने व सुहास डोंगरे, सुमीत साळुंखे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)