शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

चूक झाली तर गाठ माझ्याशी

By admin | Updated: June 17, 2016 00:24 IST

अजित पवार : तासगावात आबांच्या पुतळ्याचे भूमिपूजन

तासगाव : आबांचे काम मोठे आहे. याचा विसर पडू देऊ नका. सामान्य जनता आपल्यासोबत आहे. तिकीट देताना सर्वांना सामावून घ्या. जनमानसात चांगली प्रतिमा आहे. त्यामुळे आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत जनता राष्ट्रवादीच्याच पाठीशी राहील. आबांच्या नावाला साजेसे काम करा, चूक झाली तर गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड दम माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनी गुरुवारी कार्यकर्त्यांना दिला. तासगाव येथे बाजार समितीच्या आवारात माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन आणि बाजार समितीच्या बेदाणा सेल हॉलचे उद्घाटन पवार यांच्याहस्ते झाले. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते. यावेळी आमदार सुमनताई पाटील, माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील उपस्थित होते. पवार म्हणाले की, आबांनी राजकारणात कधीही निष्ठा सोडली नाही. मात्र त्यांच्या पश्चात काहींनी पक्ष सोडला. त्यांच्या पश्चात तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. नगरपालिका निवडणुकीत चांगल्या विचारी माणसांना संधी द्या. कोणी कितीही प्रलोभन दाखवले, दमदाटी केली तरी, ही माणसे सोबत राहायला हवीत. आबांच्यासोबत सर्व जाती-धर्माची माणसे होती. सर्व समाजाला सामावून घेऊन, महिला, तरुण, अनुभवी लोकांना तिकिटे द्या. सुमनतार्इंच्या नेतृत्वाखाली निवडणुकांना सामोरे जा. ते म्हणाले की, दुष्काळावरुन लक्ष हटविण्यासाठी पाऊस येणार म्हणून वावड्या उठविल्या जात आहेत. बाजार समित्या मोडीत काढून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे उद्योग सरकारकडून सुरु आहेत. साखरेवर निर्यातबंदी घालून ऊस उत्पादकांना अडचणीत आणले जात आहे. शेतकरी दुष्काळात होरपळत असताना कर्जमाफी दिली जात नाही. उद्योगांना मात्र सवलती दिल्या जातात. त्यामुळे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? असे यांनाच विचारण्याची वेळ आली आहे.शशिकांत शिंंदे म्हणाले की, अधिकारी खुर्चीत बसल्यानंतर लगेचच बदलीचे पत्र हातात दिले जाते. असा कारभार सध्याच्या सरकारमध्ये सुरू आहे. पक्षातून कोण गेले, कोण आले, यापेक्षा येणाऱ्या निवडणुकीत ताकद दाखवून द्या. यावेळी स्मिता पाटील, दिनकरदादा पाटील, बेदाणा व्यापारी अशोक बाफना यांनीही मनोगत व्यक्त केले. बाजार समितीचे सभापती अविनाश पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर उपसभापती सतीश झांबरे यांनी आभार मानले. (वार्ताहर)+विरोधकांच्या : दमबाजीचा समाचारकायदा हातात घेण्याचा प्रयत्न करण्याची, दमदाटीची भाषा काही नेत्यांकडून वापरली जात असेल. मात्र काहींच्या फक्त तोंडात दम असतो. आपण कोणाच्या नादी लागायचे नाही अन् कोणी आपल्या वाटेला आला, तर सोडायचे नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी तालुक्यातील विरोधकांचा समाचार घेतला. तत्पूर्वी जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिनकरदादा पाटील यांनी, बाजार समितीच्या निवडणुकीत झालेल्या प्रसंगात कोणीही मदत केली नसल्याची खंत व्यक्त करुन, ग्रामपंचायतीसह अन्य निवडणुकांत गुंडगिरी करुन जिंकण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख केला. बाजार समितीचे सभापती अविनाश पाटील यांनीही, जिल्ह्यात सत्तेच्या जोरावर विरोधकांकडून अधिकाऱ्यांवर दबाव टाकून दडपशाहीचे राजकारण सुरु असल्याचा आरोप केला होता.खासदार, आमदार झोपा काढतायत काय?युतीचे पाच आमदार आणि एक खासदार असताना, जिल्ह्यातील पाणी योजना सहा महिने बंद राहतात. मग तुम्ही सत्तेत कशासाठी आहात? जिल्ह्याचा पालकमंत्री बाहेरच्या जिल्ह्याचा. तो किती लक्ष देणार? पाणी योनजांची कार्यालये विदर्भात गेली तरी हे सत्ताधारी आमदार, खासदार झोपा काढतायत का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.