शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

नोटिसाच नाहीत तर कारवाई कसली?

By admin | Updated: October 6, 2015 00:36 IST

अतिक्रमणांचा बोजवारा : महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीत खडाजसंगी

सांगली : महापालिकेच्या अतिक्रमणांचा वेलू गगनावर गेला असताना, नगररचना विभागाकडून ५२/५३ च्या नोटिसा देण्यापलीकडे काहीच कार्यवाही केलेली नाही. या नोटिशीची मुदत संपून पाच ते सात वर्षे झाली तरी त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव सहायक आयुक्त अथवा प्रभाग अधिकाऱ्यांकडे पाठविलेला नाही. सोमवारी आयुक्त अजिज कारचे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत याच मुद्द्यावरून अधिकाऱ्यांत खडाजंगी झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. अतिक्रमणांवर हातोडा टाकण्यासाठी बाह्या सरसावलेल्या आयुक्तांनी, या प्रकरणात नेमके कुठे पाणी मुरते याचा शोध घेण्याची गरज आहे. आयुक्त कारचे यांच्या उपस्थितीत सर्व खातेप्रमुखांची बैठक झाली. शहरात वाढती अतिक्रमणे व बेकायदा बांधकामांवर बैठकीत गरमागरम चर्चा झाली. नागरिकांकडून अतिक्रमण व बेकायदा बांधकामांबाबत तक्रार आल्यास बांधकाम अभियंत्यांकडून त्याची खातरजमा केली जाते. त्यानंतर नगररचना विभागाला बेकायदा बांधकाम सुरू असल्याची सूचना दिली जाते. त्यावर नगररचना विभाग अतिक्रमण काढून घेण्याची ५२/५३ ची नोटीस संबंधित मालमत्ताधारकाला बजाविते. या नोटिशीची मुदत संपल्यानंतर मालमत्ताधारकांकडून अतिक्रमण हटविले नसलेल्या ते पाडण्याचा प्रस्ताव सहायक आयुक्त अथवा प्रभाग अधिकाऱ्यांकडे दिला जातो. या प्रस्तावावर सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांची मदत घेऊन सहायक आयुक्त अतिक्रमणांवर हातोडा टाकत असतात. पण या प्रक्रियेतच सारा गोलमाल आहे. अतिक्रमणे वाढत असताना कारवाई होत नसल्याबद्दल आयुक्तांनी सहायक आयुक्त रमेश वाघमारे यांना धारेवर धरले, तर वाघमारे यांनी बेकायदा बांधकाम, अतिक्रमणांबाबत एकही प्रस्ताव आपल्याकडे आला नसल्याचे स्पष्ट केले. नगररचना विभागाने कारवाईच्या नोटिसा बजाविल्या, त्याची मुदत संपून पाच ते सात वर्षे झाली, तरीही अतिक्रमण पाडण्याची फाईल प्रभागाकडे आलेलीच नाही, असे बैठकीत निदर्शनास आले. त्यामुळे एकूणच बैठकीचा रागरंगच बदलून गेला. शहरात किमान एक हजार जणांना कारवाईच्या नोटिसा बजाविल्याचा दावा नगररचना विभागाने केला. पण त्याची मुदत संपली आहे की नाही, त्यांनी अतिक्रमण काढले आहे की नाही, याची कुठलीही माहिती सहायक आयुक्तांना नसल्याचेही समजते. त्यामुळे कारवाई कुणावर करायची?, असा प्रश्न सहायक आयुक्तांसमोर आहे. त्यातून बैठकीत चांगलीच वादावादी झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. या प्रकरणात नेमके कुठे पाणी मुरते, कोणता विभाग अतिक्रमणाला पाठीशी घालतो, याचा सोक्षमोक्ष आयुक्तांनी लावण्याची गरज आहे. नाही तर केवळ नोटिसांवर नोटिसा दिल्या जातील आणि कारवाई मात्र शून्यच, अशी स्थिती निर्माण होईल. (प्रतिनिधी)एक हजार जण रडारवरनगररचना विभागाने शहरातील एक हजारजणांना अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस दिली आहे. शिवाय कोणी अतिक्रमण केले असेल तर त्याच्याविरोधात पोलिसांत फिर्याद दाखल करण्याचे अधिकार नगररचना विभागाला आहेत. पण यातील कोणत्याच गोष्टी होताना दिसत नाहीत. आता आयुक्तांनी प्रभाग व नगरचना या दोन्ही विभागांना धारेवर धरल्याने अतिक्रमणांवर हातोडा पडण्याची शक्यता वाढली आहे.