शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

नाट्यरंगभूमीवर पुन्हा पदार्पण करण्याचा विचार

By admin | Updated: November 6, 2014 23:00 IST

प्रकट मुलाखत : ज्येष्ठ रंगकर्मी जब्बार पटेल यांनी सांगलीतील कार्यक्रमात व्यक्त केला मनोदय

सांगली : सध्याच्या नाट्यअवकाशात मी योग्य कथा आणि कादंबरीच्या शोधात आहे. आजच्या काळातील भाषा मला सहजगत्या अवगत होईल, असे वाटत नाही. परंतु असे असले तरीही चांगल्या कथेच्या प्रतीक्षेत मी असून, प्रदीर्घ काळानंतर लवकरच नाट्यरंगभूमीवर पदार्पण करण्याचा विचार आहे. बघूया काय होते ते.., असे मत विष्णुदास भावे गौरव पदक सन्मानित ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी मनमोकळ्या संवादात व्यक्त केले. डॉ. पटेल यांना रंगभूमीदिनानिमित्त येथे विष्णुदास भावे गौरव पदकाने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर आयोजित मुलाखतीत डॉ. पटेल बोलत होते. नाट्यदिग्दर्शक डॉ. दयानंद नाईक आणि लेखक-अभिनेते अभिराम भडकमकर यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. मला भावे गौरव पदक मिळाले असले तरी, मी कोणत्याही प्रकारचे नाट्य प्रशिक्षण घेतलेले नसल्याचे सांगून डॉ. पटेल म्हणाले की, तुम्हाला समाजात घडणाऱ्या विविध घटनांकडे बारकाईने पाहण्याची दृष्टी असणे गरजेचे आहे. नाटकवेड्या माणसाला संध्याकाळचे सात वाजले की हमखास नाटकांची आठवण येतेच. अर्थात नाटकाचे वेड हे असेच असायला पाहिजे. सध्या मला अनेकजण म्हणतात की, कोणतीही कथा आणि कादंबरी घ्या आणि त्यावर नाटक अथवा चित्रपटाची निर्मिती करा; परंतु हे अशक्य आहे. कारण असे कधीच होत नाही. लेखक आणि दिग्दर्शक यांची भाषा एकरूप होणे गरजेचे आहे. मी आतापर्यंत जी निर्मिती केली आहे, त्याकडे रसिकांनी चिकित्सक दृष्टीने पाहिल्यास त्यांना याचा प्रत्यय येईल. मला लहानपणापासूनच नाटकांची आवड होती. तरुणपणी मी प्रतिष्ठेच्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत माझे गुरू विजय तेंडुलकर लिखित कथेवर आधारित नाटकात सहभाग घेतला होता. पु. ल. देशपांडे यांच्या ‘तुझे आहे तुझपाशी’ या नाटकात मी भूमिकाही केली. डॉक्टरी पेशा स्वीकारल्यानंतर मी पुणे जिल्ह्यातील दौंड येथे प्रॅक्टिस सुरू केली. तरीही मला नाटक काही स्वस्थ बसू देईना. त्यामुळे नाटकाच्या तालमी करण्यासाठी मी जवळपास रोज पुण्याला ये-जा करीत असे. असा माझा दिनक्रम जवळपास १९७१ ते १९९७ पर्यंत सुरू होता. या काळात ‘घाशीराम कोतवाल’, ‘तीन पैशांचा तमाशा’ रंगमंचावर आले. उत्तम नाटके निर्माण व्हावीत यासाठी प्रचंड मेहनत घेतल्याने त्याला रसिकांनी प्रतिसाद दिला. माणसाने सतत कार्यमग्न असणे गरजेचे असते. माझ्या जीवनात मला विजय तेंडुलकर, पु. ल. देशपांडे, डॉ. श्रीराम लागू, विजया मेहता यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. त्याचा फायदा मला पुढील वाटचालीसाठी नक्कीच झाला. नाटक, चित्रपटापेक्षा चरित्रपटाचे कार्य अवघड असते. त्यामध्ये उत्तुंग कार्यकर्तृत्व असलेल्या व्यक्तिमत्त्वांचा सखोल अभ्यास करावा लागतो. महत्त्वाचे म्हणजे त्याचे दैवतीकरण होणार नाही, याचीही खबरदारी बाळगावी लागत असल्याचेही डॉ. पटेल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)दूरदर्शन क्षेत्रात काम नाहीसध्या डेली सोपचे फॅड आहे. दूरदर्शनवर सुरू असलेल्या या मालिकांमधील मुख्य दोष म्हणजे बहुतांशी मालिकांची कथाच तयार नसते. टीआरपी जसा बदलत जाईल, त्याप्रमाणात मालिकांची कथादेखील बदलत जाते. या प्रकाराला काहीही अर्थ नाही. वाट फुटेल तिकडे जाणारा कथाप्रकार मला मान्य नाही. तुमच्या डोक्यात तुमची कथा तयार पाहिजे. मग भले कमी भागात मालिका संपली तरी हरकत नाही. परंतु कथेत तडजोड करण्याची माझी वृत्ती नसल्याने भविष्यकाळात मी दूरदर्शन क्षेत्रात कार्य करीन, असे मला वाटत नसल्याचे डॉ. पटेल यांनी सांगितले.