शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘हायड्रोफोनिक’द्वारे चारा टंचाईवर यशस्वी मात...

By admin | Updated: May 25, 2016 00:18 IST

सकस चारा निर्मिती : कुमठेच्या कल्पना पाटील यांचा प्रकल्प

प्रदीप पोतदार -- कवठेएकंद कुमठे (ता. तासगाव) येथील कल्पना जनार्दन पाटील यांनी चारा निर्मितीसाठी हायड्रोफोनिक प्रकल्पाची उभारणी करून चारा टंचाईवर उत्तम पर्याय शोधला आहे. सकस व दर्जेदार चारा निर्मितीमुळे किफायतशीर पशुपालनाचा आदर्शच सिध्द केला आहे. कुमठे हे कायमस्वरूपी दुष्काळी पट्टा असणारे गाव. आरफळ योजनेचे शेवटचे टोक असल्यामुळे पाण्यासाठीची पायपीट ठरलेलीच. अशा प्रतिकूल परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची कमतरता. मग जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न अतिशय बिकटच. मात्र कल्पना पाटील यांनी त्यावर मात केली. काही दिवसांपर्यंत पशुपालन करताना, संसाराला उभारी मिळायची. नुसत्या दूध-दुपत्यावर घराचा आर्थिक गाडा चालायचा. पण पशुखाद्य, सरकी पेंड, चारा यासारख्या घटकांचे दर वाढल्याने व दुधाचे दर मात्र त्या तुलनेत न वाढल्याने पशुपालन तोट्याचे ठरत आहे. त्याबरोबरच खराब हवामान, दुष्काळी परिस्थिती, कडक उन्हाळा यामुळे जनावरांच्या प्रकृतीवरही परिणाम होत आहे. पाटील यांनी गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून हायड्रोफोनिक प्रकल्पातून अंकुरीत होणारा चारा जनावरांना दिला आहे. त्यातून चार जनावरांचे संगोपन करत आहेत. यासाठी १० बाय १५ फुटाच्या जागेत छोटा चार टप्प्यांचा रॅकचा सांगडा उभारला आहे. त्यामध्ये २१ प्लॅस्टिक ट्रेद्वारे मका, गहू यांचा अंकुरनिर्मित चारा दहा दिवसात उपलब्ध होतो. सुमारे २५ हजार रुपये खर्चून प्रकल्प उभा केला आहे. शासनाच्या कृषी विभागाकडून अनुदान मिळाले आहे. प्रारंभी प्रयोगशील पध्दतीने हात स्प्रेने पाणी दिले जात होते. आता प्रकल्पातील अंकुरीत धान्याला एका तासाच्या अंतराने ३० सेकंद तुषार सिंचन पध्दतीने पाणी देण्याच्या स्वयंचलित पध्दतीचा अवलंब त्यांनी केला आहे. या प्रकल्पातून सकस चारा उपलब्ध होतो. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्यादृष्टीने कुमठेच्या कल्पना पाटील यांच्या प्रकल्पास अनेक कृषी विभाग, पशू विभागातील अधिकारी व सेवक वर्गाने भेटी दिल्या आहेत. जास्तीत जास्त पशुपालकांनी हा प्रकल्प करावा, यासाठी त्यांनी काही शेतकऱ्यांनाही चारा देऊ केला. पशुपालनाबरोबरच गांडूळ खत निर्मिती, गोबर गॅस प्रणालीतूनही खतनिर्मिती करून सेंद्रीय शेतीवर भर दिला असल्याचे पाटील यांनी सांगितले. कुमठे (ता. तासगाव) येथील कल्पना जनार्दन पाटील यांनी चारा निर्मितीसाठी हायड्रोफोनिक प्रकल्पाची उभारणी करून चारा टंचाईवर पर्याय शोधला आहे. दूध उत्पादनातही सुधारणाघरामध्ये कर्ती पुरूष मंडळी असतानाही जनावरांची जबाबदारी माझ्याकडेच आहे. कृषी प्रदर्शनातून या प्रकल्पाबाबत माहिती घेतली. सकस चारा कमी खर्चात, कमी जागेत तयार होतो, हे सिध्द झाले. सरकी पेंड, पशुखांद्याचा वापर पूर्णपणे बंद केला तरीही दूध उत्पादनात वाढ असून दुधाचे फॅट वाढून दर्जा सुधारला असल्याचे कल्पना पाटील यांनी सांगितले.