शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

मार्केट यार्डमध्ये हमालांचा संप

By admin | Updated: January 3, 2015 00:13 IST

दहा कोटींची उलाढाल ठप्प : तीस टक्के दरवाढीची मागणी

सांगली : तीस टक्के हमाली वाढीच्या मागणीवरुन हमाल कामगारांनी बुधवारी सायंकाळपासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. शुक्रवारीही आंदोलनच सुरु होते. यामुळे रोजची आठ ते दहा कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. हमाल कामगार मागण्यावर ठाम आहेत. व्यापाऱ्यांकडून हमालांच्या मागणीकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्यामुळे आंदोलन चालूच आहे. दरम्यान, हमाल संघटनांनी आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा दिला आहे.हमाल दरवाढीचा प्रत्येक दोन वर्षानी नवा करार होतो. जुन्या कराराची मुदत ३१ डिसेंबर २०१४ रोजी संपली. नवा करार करताना हमालीच्या दरात तीस टक्के वाढ करण्यात यावी, अशी मागणी हमाल पंचायतीने केली आहे. या प्रमुख मागणीसाठी हमालांनी तीन दिवसांपासून आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाकडे व्यापारी आणि प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा हमालांनी इशारा दिला आहे.व्यापाऱ्यांनी मात्र ९ टक्के हमाली वाढीला मंजुरी दिली आहे. यावरुन बोलणी फिसकटल्याने बुधवारी सायंकाळपासून हमाल पंचायतीने काम बंद आंदोलन सुरु केले. अचानक काम बंद झाल्याने मालाची चढ-उतार थांबली. आजची सुमारे आठ ते दहा लाखांची उलाढाल ठप्प झाली. आंदोलनाबाबत हमाल पंचायतीचे नेते विकास मगदूम म्हणाले की, हमालांची संपाची इच्छा नव्हती. मात्र व्यापाऱ्यांनी ९ टक्क्याच्या वर हमाली देण्यास नकार दिला. चर्चेसाठीही वेळ दिली नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीने बोलाविलेल्या बैठकीलाही व्यापारी प्रतिनिधी अनुपस्थित राहिल्याने आम्हाला संपाशिवाय पर्याय राहिला नाही. आता व्यापाऱ्यांच्या भूमिकेवरच संपाची माघार अवलंबून राहणार आहे. (प्रतिनिधी)चर्चा सुरु असताना संप : सारडा व्यापाऱ्यांनी हमालांच्या प्रतिनिधीबरोबर चर्चा सुरु केली होती. कोणत्याही परिस्थितीत संप करायचा नाही असे ठरले असतानाही हमालांनी संप केला आहे, अशी माहिती चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष मनोहर सारडा यांनी दिली. आम्ही ९ टक्के हमाली वाढीस होकार दिला आहे. सध्याच्या मंदीच्या काळात व संपूर्ण राज्यात ही सर्वाधिक हमाली आहे. असे असतानाही हजारो पोती हळद व लाखो रवे गूळ मार्केट यार्डमध्ये पडून आहे. यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे.