शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

कशी होणार इस्लामपूरची बारामती?

By admin | Updated: December 24, 2015 00:51 IST

जागोजागी घाणीचे साम्राज्य : नगराध्यक्षांच्याच ‘मॉर्निंग वॉक’चा रस्ता प्रदूषणमय!

इस्लामपूर : इस्लामपूरचे नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी राजारामबापू साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी येतात. नगराध्यक्षांसह शहरातील नागरिक या मार्गाचा व्यायामासाठी वापर करतात. परंतु या रस्त्याकडेच्या गटारी तुंबल्या असून, घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याची दुर्गंधी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्यांना सहन करावी लागते. त्यामुळे इस्लामपूरची ‘बारामती’ कशी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.इस्लामपूर शहर ते राजारामबापू साखर कारखाना या रस्त्यावर पहाटे फिरायला येणाऱ्यांची संख्या मोठी असते. नगराध्यक्ष सूर्यवंशी हेही गेल्या काही वर्षांपासून न चुकता येथे मॉर्निंग वॉकसाठी येतात. या रस्त्याकडेला इस्लामपूर हायस्कूल, ज्ञानदीप इंटरनॅशनल स्कूल व राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. त्यांच्या संरक्षक भिंतीलगतच गटारी आहेत. त्या तुंबल्या आहेत. या दुर्गंधीचा त्रास मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्यांना सहन करावा लागत आहे. याचा त्रास खुद्द नगराध्यक्षांना होत असला तरी, त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जाते. ही बाब व्यायामासाठी येणाऱ्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. मात्र याकडे त्यांनी गांभीर्याने पाहिले गेलेले नाही. माजी मंत्री, आमदार जयंत पाटील बहुतांश वेळ याच मार्गावरुन ये-जा करतात. तेही या समस्येबाबत अनभिज्ञ आहेत. पालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी पदपाथ केला आहे. त्यालगतच गटारी आहेत. या गटारींच्या भिंतीनाच काहींनी शेण्या लावल्या आहेत. त्या शेण्या पाण्यात पडून अनेकवेळा गटारी तुंबत आहेत. त्याचा त्रास शाळेतील विद्यार्थ्यांनाही सहन करावा लागत आहे. या गटारी तात्काळ प्रवाहित कराव्यात, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)गेल्या दहा वर्षाहून अधिक काळ आम्ही या रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी येतो. तुंबलेल्या गटारींमुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यावर शाळा, महाविद्यालये आहेत. या इमारतींच्या संरक्षक भिंतीनजीक गटारी तुंबलेल्या आहेत. - डॉ. सुरेंद्र उमराणी, डॉ. अमृत पाटील, इस्लामपूर.पटांगणावर भाडे : हेलिपॅडवर कचराराजारामबापू साखर कारखान्याकडे जाणाऱ्या याच रस्त्यावर शहरानजीक खुले नाट्यगृह आहे. त्याच्या पटांगणावर काही वृध्द सकाळी फिरण्यासाठी येत असतात. परंतु पालिकेने त्यासाठी प्रतिमहा पन्नास रुपये भाडे आकारले आहे. त्यामुळे अनेकांनी रस्त्यावरून चालणेच पसंत केले आहे. साखर कारखान्याच्या हेलिपॅडच्या मैदानावर फिरणेही मुश्कील झाले आहे. तेथे फिरावयास गेलेल्या नागरिकांना डोळ्यात कचरा जाण्याचा त्रास होऊ लागला आहे.