शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हात, भांडी धुतलेल्या पाण्यातून झाडे जगविली

By admin | Updated: May 18, 2016 00:14 IST

प्रतिदिन २०० लिटर पाण्याची बचत : मंगेशकर नगरमधील सांगलीकर कुटुंबीयांचा उपक्रम

संतोष मिठारी --कोल्हापूर --हात धुतलेले, तसेच भांडी धुण्यासाठी वापरलेले अनेकांच्या घरातील पाणी थेट गटारीमध्ये जाते; पण याला मंगेशकर नगरातील सांगलीकर कुटुंबीय अपवाद ठरले आहेत. त्यांनी या पाण्याच्या पुनर्वापरातून आपल्या बंगल्याच्या परिसरातील विविध झाडे जगविली आहेत.या पाणी बचतीच्या प्रयत्नांबाबत गौरव सांगलीकर यांनी सांगितले की, मंगेशकरनगरमधील आमच्या बंगल्यात आई-वडिलांसह मी राहतो. बंगल्याच्या आवारात विविध फळे व फुलांची झाडे आम्ही लावली आहेत. सध्याच्या दुष्काळाच्या स्थितीत पाण्याची उपलब्धता कमी आहे. अशा स्थितीत झाडांना पाणी देण्यासाठी अन्य ठिकाणांहून पाणी उपलब्ध करणे अथवा खरेदी करण्याऐवजी आपल्याजवळ असलेल्या पाण्याचा योग्य पद्धतीने कसा वापर करता येईल, याचा आमचा विचार सुरू होता. वॉश बेसिन, भांडी धुतल्यानंतर उपलब्ध होणारे पाणी झाडांसाठी वापरण्याचे सुचले. अनेकदा हे पाणी वायाच जाते; पण आम्ही त्याचा पुनर्रवापर करण्याचे ठरविले. त्यानुसार वॉश बेसिनच्या नळाखाली मोठे भांडे ठेवले. त्यात हात आणि भांडी धुतल्यानंतरचे पाणी आम्ही वाचविले. हे पाणी बंगल्याच्या परिसरातील झाडांना दररोज दिले जाते. त्यासह वॉटर प्युरिफायरमधून बाहेर पडणारे अतिरिक्त स्वरूपातील पाणी थेट परसातील झाडांना दिले जात आहे. पाणी बचतीचा आमचा हा प्रयत्न छोटासा आहे. मात्र, त्यातून आम्हाला वेगळे समाधान मिळत आहे.गरजेनुसार पाणी वापरावेया प्रयत्नातून आम्ही दिवसाकाठी सुमारे २०० लिटर पाणी वाचवितो. झाडांना पुरेसे पाणी मिळाल्याची खात्री झाल्यानंतर हात, भांडी धुण्यातून उपलब्ध होणारे पाणी जमिनीत मुरविले जात असल्याचे गौरव सांगलीकर यांनी सांगितले. ते म्हणाले, आता आम्ही अंघोळ आणि हात-पाय धुण्यासाठी वापरलेल्या पाण्याची बचत करणार आहोत. त्यासाठी बंगल्याच्या आवारात छोटीशी टाकी बांधून त्यामध्ये पाणी साठविणार आहे. साठविलेले हे पाणी ठिबक सिंचन पद्धतीने झाडांना देण्याची व्यवस्था करणार आहे. पाणी हे जीवन आहे. त्यामुळे त्याची बचत करणे गरजेचे आहे. ते लक्षात घेऊन प्रत्येकाने गरजेनुसार पाण्याचा वापर करावा. छोट्या-छोट्या प्रयत्नांतून पाण्याची बचत करणे शक्य आहे. हे प्रयत्न कृतीत आणणे महत्त्वाचे आहे.