शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणाच्या फासामुळे रुग्णालयांचा जीव गुदमरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:10 IST

सांगली : शहरातील रस्ते, फुटपाथ, चौकातील अतिक्रमणे हा नेहमीचाच विषय आहे. त्यात जिल्हा व महापालिका रुग्णालयेही या अतिक्रमणाच्या विळख्यातून ...

सांगली : शहरातील रस्ते, फुटपाथ, चौकातील अतिक्रमणे हा नेहमीचाच विषय आहे. त्यात जिल्हा व महापालिका रुग्णालयेही या अतिक्रमणाच्या विळख्यातून सुटलेली नाहीत. सांगलीच्या शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच हातगाडीवाल्यांनी ठाण मांडले, तर महापालिका प्रसूतीगृहासमोर वर्षानुवर्षे फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणामुळे रुग्णालयांचा श्वास गुदमरतोय तरीही प्रशासनाने त्याची दखल घेण्याची तसदीही कधी घेतलेली नाही.

सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात जिल्ह्यासह कर्नाटक व कोल्हापूर जिल्ह्यांतूनही रुग्ण उपचारासाठी येतात. आधीच रुग्णालयाकडे जाणारा रस्ता अरुंद आहे. त्यातच अर्धा रस्त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. एका बाजूला रिक्षा थांबा, तर दुसऱ्या बाजूला फळविक्रेते, किरकोळ विक्रेत्यापासून ते कापड व्यापाऱ्यापर्यंत साऱ्यांनी रस्ता व्यापला आहे.

रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला चार हातगाडे लागलेले असतात. त्या हातगाड्यांवर रुग्णांच्या नातेवाइकांसह नागरिकांची गर्दी असते. या गर्दीतून वाट काढत रुग्णवाहिका सिव्हिलमध्ये दाखल होत असतात. सिव्हिल प्रशासनाने अनेकदा महापालिकेला पत्र पाठवून अतिक्रमण हटविण्याची विनंती केली, पण महापालिकेने त्याकडे जाणीवपूवर्क दुर्लक्ष केले.

दुसरीकडे महापालिकेचे एकमेव रुग्णालय असलेले सा‌वित्रीबाई फुले प्रसूतीगृहासमोर फेरीवाल्यांचे अतिक्रमण आहे. पालिकेचे अधिकारी दररोज या परिसरातून ये-जा करतात, पण त्यांनी अतिक्रमणाकडे ढुंकूनही पाहिलेले नाही. महिला रुग्णांना प्रसूतीसाठी अन्य रुग्णालयांत हलविताना रुग्णवाहिका चालकाला हातगाड्या बाजूला घ्या, अशी विनंती करावी लागते. प्रशासनाच्या वरदहस्ताने रुग्णालये अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहेत.

चौकट

रुग्णालयात मॉकड्रील नाहीच

महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून शहरात व्यापारी संकुल, शासकीय कार्यालयात माॅकड्रील करण्यात आले आहे, पण जिल्हा रुग्णालयात मात्र माॅकड्रील झालेले नाही. केवळ पाहणीसाठी अधिकारी येत असल्याचे सांगण्यात आले.

चौकट

आपत्कालीन मार्ग बंद

n महापालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहाला एकच प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारातून रुग्णांची ये-जा सुरू असते.

n पूर्वी प्रसूतीगृहाला दोन्ही बाजूंनी प्रवेश होता, पण गेल्या काही वर्षांपासून हरभट रोडकडील प्रवेशद्वार बंदच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत बाहेर पडण्याचे मार्गच संपुष्टात आला आहे.