शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

शिराळा तालुक्यातील गुऱ्हाळघरांना घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुनवत : गुळाच्या दरात सातत्याने होणारी गळचेपी, मजुरांचा तुटवडा, भांडवलाची कमतरता, वाढलेला उत्पादन खर्च यामुळे शिराळा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुनवत : गुळाच्या दरात सातत्याने होणारी गळचेपी, मजुरांचा तुटवडा, भांडवलाची कमतरता, वाढलेला उत्पादन खर्च यामुळे शिराळा तालुक्यातील गुऱ्हाळघरांना घरघर लागली आहे. तालुक्यात यावर्षी केवळ पाचच गुऱ्हाळघरे सुरू आहेत.

शिराळा तालुका गूळ उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. एकेकाळी तालुक्यातील गुऱ्हाळघरांची संख्या शंभराच्या घरात होती. मात्र अलीकडच्या काही वर्षात ती वेगाने कमी होत सध्या केवळ पाचवर आली आहे. उद्योगातील तोट्यांमुळे शेतकरी व गुऱ्हाळमालकांनी या उद्योगाकडे पाठ फिरविली आहे.

छोटी उत्पादने व वैयक्तिक विक्री

बाजारपेठेत होणाऱ्या तोट्यामुळे अनेक उत्पादकांनी ३० किलोच्या रव्याऐवजी १०, पाच, एक किलोची उत्पादने घेऊन ती स्थानिक बाजारात तसेच गावोगावी विक्री करायला सुरुवात केली आहे. यामध्ये क्विंटलला चार हजाराचा दर मिळत आहे. मोठ्या बाजारपेठेत मात्र तोटा सहन करावा लागत आहे.

एकीकडे शेतकऱ्यांनी गुऱ्हाळघरांकडे पाठ फिरविलेली असताना, काही गुऱ्हाळ मालकांनी शेतकऱ्यांचा ऊस वजनावर विकत घ्यायला सुरुवात केली असल्याने गुऱ्हाळघरांना थोडा तरी ऊस मिळत आहे. काही शेतकरी गुऱ्हाळमालकांना गळिताचे केवळ भाडे देऊन व्यापारी तत्त्वावर सामान्य व सेंद्रिय गुळाची निर्मिती करत आहेत. त्याच्या विक्रीतून अशा शेतकऱ्यांना बाजारपेठेपेक्षा चांगला दर मिळत आहे. तालुक्यातील शेकडो चाकरमानी रोजगारानिमित्त मुंबई, पुण्यामध्ये आहेत. अशा लोकांनी तालुक्यातील गूळ उद्योगाला गतवैभव मिळवून देण्यासाठी या गुळाला शहरात बाजारपेठ मिळवून देण्याची आवश्यकता आहे.

चौकट -

सेंद्रिय गुळाचा प्रयोग

कापरी (ता. शिराळा) येथील प्रगतशील शेतकरी संदीप पाटील यांनी सेंद्रिय उसापासून पूर्ण सेंद्रिय गुळाची निर्मिती करून तो गूळ, काकवी, खडा, पावडर असा प्रत्यक्ष व ऑनलाईन पद्धतीने ग्राहकांपर्यंत पोहोचवून किफायतशीर व्यवसाय केला आहे.