शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांकडून होळी; काँग्रेसचे प्रत्युत्तर

By admin | Updated: July 22, 2014 00:39 IST

मनपा अंदाजपत्रकीय सभा : सभागृहाबाहेर भिडले

सांगली : महापालिकेच्या अंदाजपत्रकावर आज, सोमवारी सभेपेक्षा सभागृहाबाहेरच सत्ताधारी व विरोधकांत रणकंदन माजले. सभा संपल्यानंतर राष्ट्रवादी व स्वाभिमानी आघाडीच्या नगरसेवकांनी पालिका मुख्यालयासमोर अंदाजपत्रकाच्या पुस्तकाची होळी केली, तर याच्या निषेधार्थ महापौर कांचन कांबळे, गटनेते किशोर जामदार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करीत, विरोधकांना सद्सद्विवेकबुद्धी द्यावी, असे साकडे घातले. दोन्ही बाजूच्या घोषणांनी मुख्यालय दणाणून गेले.महापालिकेच्या अंदाजपत्रकावरील चर्चेवेळी सभागृहात सत्ताधारी व विरोधकांत जोरदार खडाजंगी झाली. या गोंधळातच महापौर कांबळे यांनी अंदाजपत्रकाला मंजुरी दिली. सभा संपल्याचे जाहीर करताच विरोधक आक्रमक झाले. त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. हा गोंधळ पंधरा ते वीस मिनिटे सुरू होता. सभागृहात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपया’ असे फलक आणले होते. सभा संपल्यानंतर हे फलक सभागृहात फडकविले. त्यानंतर राष्ट्रवादी व स्वाभिमानी आघाडीचे नगरसेवक एकत्र येत त्यांनी अंदाजपत्रकाच्या पुस्तकाची होळी केली. यावेळी विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, भाजपचे गौतम पवार, गटनेते शिवराज बोळाज, माजी महापौर मैनुद्दीन बागवान उपस्थित होते. / पान २ वरअंदाजपत्रकावर सूचना मांडण्यापेक्षा विरोधकांनी वैयक्तिक टीका सुरू केली. त्यांना दोनदा विनंती करूनही राजकीय चर्चा सुरूच ठेवली होती. लोकसभेला काय झाले, विधानसभेला काय होणार, ही चर्चा करण्यासाठी सभा नव्हती. यापुढे विरोधकांना जशास तसे उत्तर देऊ. सभागृह कसे चालवायचे, हे आम्हाला चांगलेच कळते. - किशोर जामदार, गटनेते, काँग्रेसमहापालिकेच्या अंदाजपत्रकात रस्ते, खड्डे, नागरी प्रश्नांसाठी तरतूद नाही. उत्पन्नाचे मार्ग वाढविण्याचाही विचार केलेला नाही. सत्ताधाऱ्यांनीच राजकीय घोषणाबाजी करीत सभेतून पळ काढला. त्यांचा निषेध म्हणून अंदाजपत्रकाची होळी केली.- गौतम पवार,नगरसेवक, स्वाभिमानी आघाडी.