शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

धरणग्रस्तांसाठी महामार्ग रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2016 00:37 IST

वाघवाडीत रास्ता रोको : पाठिंब्यासाठी आंदोलन तीव्र होणार

 पेठ : धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी गेले सहा दिवस चांदोली (ता. शिराळा) येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुणे-बंगलोर महामार्गावरील वाघवाडी (ता. वाळवा) फाट्यावर शनिवारी रास्ता रोको करण्यात आला. युवक काँग्रेसचे माजी वाळवा तालुकाध्यक्ष नजीर वलांडकर यांच्या नेतृत्वाखाली हा रास्ता रोको करण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. वाळव्याचे सरपंच गौरव नायकवडी गेल्या सहा दिवसांपासून धरणग्रस्तांच्या विविध प्रश्नांसाठी लढा देत आहेत. त्यांच्या लढ्याला पाठिंबा म्हणून वलांडकर यांनी वाघवाडी फाट्यावर महामार्ग रोको केला. सकाळी अकरा वाजता कार्यकर्ते वाघवाडी फाट्यावरील शेतकी कार्यालयापासून महामार्गापर्यंत हातात बॅनर घेऊन घोषणा देत आले. प्रारंभी पोलिसांनी वलांडकर यांच्यासह आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांना न जुमानता त्यांनी २० मिनिटे महामार्ग रोखून धरला. यावेळी वाहतूक ठप्प झाली होती. वलांडकर म्हणाले की, धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर शासनाने आता झोपेचे सोंग घेऊ नये. निद्रिस्त शासकीय यंत्रणेला जागे करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करीत आहोत. गौरव नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन चालू आहे, त्यास आमचा पाठिंबा आहे. यानंतर पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन इस्लामपूर पोलीस ठाण्यात नेऊन सोडून दिले. यावेळी विक्रम शिंदे, संजय अहिर, नितीन घबक, नंदू पाटील, भगवान पाटील, सावकर कदम, गजानन पाटील, अशोक जाधव, शंकर जाधव, बाजीराव नायकवडी, उमेश घोरपडे, दत्तात्रय चव्हाण, संजय अहिर, विक्रम शिंदे, प्रताप शिंदे उपस्थित होते. अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मीकांत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. (वार्ताहर)