शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

‘म्हैसाळ’ला टंचाईतूनच मदत करा

By admin | Updated: January 11, 2016 00:46 IST

पतंगराव कदम : तिजोरीत कधीच खडखडाट नसतो

सांगली : राज्याच्या तिजोरीत कधीच खडखडाट नसतो. दररोज शासनाकडे पैसा येत असतो. त्यामुळे टंचाईतून म्हैसाळ योजनेला पैसा देणे शक्य आहे. दुष्काळी परिस्थितीचा विचार करून शासनाने योजनेला मदत केली पाहिजे, असे मत आ. पतंगराव कदम यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले की, देशात आणि राज्यात सध्या वेगळे वातावरण आहे. दुष्काळ आणि पाणीप्रश्न तसेच प्रलंबित आहेत. लोकांना काय कळायचे ते कळलेले आहे. ‘म्हैसाळ’च्या प्रश्नावर सरकारनेच उपाय शोधला पाहिजे. आमच्या काळात टंचाईतून योजनांची बिले भागविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये घेतला होता. आताच्या सरकारनेही याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन म्हैसाळ योजनेस मदत करावी. ताकारी योजनेची परिस्थिती वेगळी आहे. याठिकाणी कारखान्यांनी ऊस बिलातून वसुली करून योजनांची बिले भागविली. ‘म्हैसाळ’च्या परिस्थितीचा अभ्यास करून याठिकाणी उपाय शोधले पाहिजेत. सहकारी संस्थांची जी संचालक मंडळे बरखास्त झाली आहेत, त्यांची प्रथम चौकशी झाली पाहिजे. चौकशीत ते त्या भ्रष्टाचाराला जबाबदार असतील, तरच त्यांच्याविषयीचा पुढील निर्णय घ्यावा. सहकारी संस्थांमुळे महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा पाया रचला गेला. त्यामुळे या संस्था टिकल्या पाहिजेत, त्यादृष्टीने निर्णय घेतले पाहिजेत. त्या मोडीत निघतील, अशापद्धतीने धोरण राबविणे चुकीचे ठरेल. मी सहकारमंत्री असताना कोणत्याही संस्था बरखास्त केल्या नाहीत. काही बँकांच्या बरखास्तीचा निर्णय नाबार्ड आणि रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार झाला होता. सहकार चळवळ अधिक मजबूत व्हावी, असे धोरण आम्ही स्वीकारले होते, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)...तर स्वबळावर आगामी जिल्हा परिषद तसेच नगरपालिकांच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढवू. राष्ट्रवादीला सोबत येण्याची विनंती केली जाईल. ते सोबत आले तर ठीक, नाही तर आम्ही आमच्या ताकदीवर लढू, असे पतंगराव कदम म्हणाले.