शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपल

By admin | Updated: August 24, 2014 23:17 IST

सांगली जलमय : पलूसला विजेचा कडकडाट, इस्लामपुरातील नाले तुंबले

सांगली : सांगली, मिरज शहरासह वाळवा, शिराळा आणि पलूस तालुक्यास रविवारी दुपारी मुसळधार पावसाने झोडपले. तासाभराच्या पावसाने सांगली जलमय झाली होती. शहराच्या बहुतांश चौकांमध्ये, बाजारपेठेत रात्री उशिरापर्यंत पाणी साचून राहिले होते. सांगली, मिरज शहरात सलग तीन दिवस पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी दुपारीही जोरदार पाऊस झाला होता. रविवारी पुन्हा दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसास सुरूवात झाली. तासभर सुरू असलेल्या या पावसाने सांगलीला जलमय बनविले. हरभर रोड, मारुती चौक, मारुती रोड, शिवाजी मंडई परिसर, झुलेलाल चौक, स्टेशन रोड, छत्रपती शिवाजी स्टेडियम, तरुण भारत क्रीडांगण, आमराई रोड, दामाणी हायस्कूल परिसर आदी भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिले होते. मारुती रोडवर सध्या गणेशोत्सवामुळे विक्रेत्यांनी स्टॉल उभारले आहेत. खरेदीसाठीही गर्दी होत आहे. अशावेळी मुसळधार पावसाने विक्रेते व खरेदीदार नागरिकांची तारांबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत मुख्य बाजारपेठांमध्ये अर्धा फूट पाणी साचून राहिल्याने नागरिकांचे, विक्रेत्यांचे हाल झाले. पावसाळी पाणीनिचऱ्याची यंत्रणा कोलमडल्याचे दिसून येत होते. महापालिकेला रविवारी सुट्टी असल्याने पाणी निचऱ्यासाठी कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. सांगलीत सर्वत्र पाणी साचून राहिले होते. सांगलीच्या शंभर फुटी, चिंतामणीनगर व अन्य गुंठेवारी भागातही या पावसामुळे दलदल निर्माण झाली आहे. भारतीय हवामान खात्याने सांगली शहरासह जिल्ह्यात आणखी आठवडाभर अशाच स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने गुंठेवारीतील अवस्था आणखी बिकट होण्याची चिन्हे दिसत आहेत. पावसामुळे शहरातील तपमानातही घट झाली आहे. पावसानंतर शहरात कमाल तपमान ३०, तर किमान २१ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. दरम्यान, शिराळा, मांगले परिसराला पावसाने झोडपून काढले. या परिसरात एक तास मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. सलग दुसऱ्यादिवशीही शिराळा तालुक्यात पाऊस झाला. विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावले. सायंकाळी पावसामुळे शिराळ्यातील वीज गायब झाली होती. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत होता. (वार्ताहर)