शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, २१ जूनपासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, २१ जूनपासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. शनिवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरुच होती. चोवीस तासात सर्वाधिक पावसाची नोंद शिराळा तालुक्यात झाली आहे. सांगलीतील नदीपातळी अद्याप स्थिर असल्याने नदीकाठच्या नागरिकांना तूर्त दिलासा मिळाला आहे.

सांगली जिल्ह्यात यंदा मान्सूनच्या सुरुवातीलाच पावसाचा जोर अधिक आहे. त्यामुळे जूनच्या वीस दिवसात अनेक तालुक्यांत मागील वर्षापेक्षा अधिक पाऊस झाला आहे. शुक्रवारी रात्रभर पुन्हा जोरदार पाऊस झाला. शनिवारी सकाळपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली. दिवसभर पावसाची रिपरिप सुरुच होती. धरण पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस कायम आहे. वारणा धरण क्षेत्रात शनिवारी सकाळी ५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरणातून सध्या १ हजार ६०५ क्युसेकने विसर्ग सुरु आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.

चौकट

कृष्णा नदीची पाणीपातळी स्थिर

सांगलीतील आयर्विन पुलाजवळील कृष्णा नदीची पातळी गेल्या चोवीस तासात स्थिर राहिली. शनिवारी दुपारी १ वाजेपर्यंत येथील पाणीपातळी २० फूट इतकी होती. बहेजवळ ९, ताकारीत २३.११, भिलवडीत २३.३, अंकलीत २५.३ फूट पाणीपातळी नोंदली गेली.

चौकट

जिल्ह्यातील पाऊस मि. मी.

इस्लामपूर २०.९

पलूस १४.६

तासगाव ११.९

सांगली २२.८

शिराळा ३०.३

मिरज २४.६

विटा १८.८

आटपाडी ११.५

कवठेमहांकाळ २३

जत ८.३

कडेगाव २२.३

चौकट

दुष्काळी तालुक्यात यंदा जोरदार सुरुवात

मागील वर्षातील पावसाळ्यात १९ जूनपर्यंतची दुष्काळी तालुक्यातील एकूण आकडेवारी पाहिली तर यंदा जत, आटपाडी व कवठेमहांकाळ या तालुक्यांत पावसाची सुरुवात चांगली झाली आहे. विटा-खानापूरमध्ये मागील वर्षी १३० मि. मी. तर यंदा ६९.२, आटपाडीत मागील वर्षी ८० तर यंदा ७७.२, कवठेमहांकाळला मागील वर्षी १२२ तर यंदा १२८.२, जतला मागील वर्षी ५६ तर यंदा १४५.५ मि. मी. पाऊस नोंदला गेला आहे.

चौकट

धरणांच्या साठ्यात वाढ

आलमट्टीतून सध्या विसर्ग सुरु नाही. कोयनेतून २ हजार १००, वारणा धरणातून १ हजार ६०५ क्युसेकने विसर्ग सुरु आहे. कोयना धरणात ३६.३, वारणा धरणात ३४.४० टक्के इतका पाणीसाठा आहे.