शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

युवकांचे हृदयसम्राट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:10 IST

राजकारणावर पकड व समाजकारणाची जाण असणारे एक संयमी, अनुभवी व प्रसन्न व्यक्तिमत्त्व डॉ. पतंगराव कदम साहेब यांचा वारसा समर्थपणे ...

राजकारणावर पकड व समाजकारणाची जाण असणारे एक संयमी, अनुभवी व प्रसन्न व्यक्तिमत्त्व डॉ. पतंगराव कदम साहेब यांचा वारसा समर्थपणे चालविणारे युवा नेतृत्व विश्वजीत ऊर्फ बाळासाहेब कदम यांना लहानपणापासूनच समाजकारणाबरोबर राजकारणाचे बाळकडू मिळाले.

पतंगराव कदम साहेब यांच्या निधनानंतर विश्वजीत ऊर्फ बाळासाहेब कदम यांच्यावर जनतेने विश्वास ठेवून विक्रमी मताधिक्याने विधानसभेवर पाठविले. पतंगराव कदम साहेबांची पुण्याई, जनतेचा विश्वास, परिवारातील सर्व सदस्यांची लाभलेली साथ व काॅंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते जपत आज बाळासाहेब राज्याच्या मंत्रिपदी विराजमान झाले आहेत.

भारती विद्यापीठाचा कार्यवाहक व महाराष्ट्र राज्याचे युवक प्रदेशाध्यक्ष पदावर काम करत असताना मिळालेले अनुभव पाहता बाळासाहेबांना मिळालेल्या मंत्रिपदाच्या संधीचे सोने करून जनतेचा विश्वास सार्थ ठरवून वडिलांच्या कार्यास साजेसे असे काम करणारे नेतृत्व महाराष्ट्र राज्याला लाभले आहे.

केवळ शैक्षणिक संस्था आणि राजकारण यापुरतेच त्यांचे काम मर्यादित नाही, तर त्यांनी हाती घेतलेले ‘मुलगी वाचवा अभियान’ही यशस्वीरीत्या राबवून महिला सक्षमीकरणाला बळकटी देण्याचे कार्य केले. बाळासाहेबांनी सामाजिक कार्याबरोबर क्रीडा क्षेत्रातही चांगला ठसा उमटवला आहे.

महापूर असो की कोणतीही आपत्ती असो बाळासाहेब तेथे जातीने हजर असतात. आपल्या सर्व कार्यकर्त्यांची फौज मदतकार्यात सहभागी करून जनतेला आधार देत असतात. पुराच्या वेळी पूरग्रस्तांना राहण्याची, जेवणाची सोय दुधोंडी, रामानंदनगर, भिलवडी येथे केली. सर्वसामान्यांना मदतीचा हात देणारे नेतृत्व म्हणून बाळासाहेब यांच्याकडे पाहिले जाते.

पुण्यासारख्या राज्याच्या सांस्कृतिक राजधानीत वाढलेल्या बाळासाहेबांचे नेतृत्व राज्याच्या पटलावर सुसंस्कृत नेतृत्व म्हणून उदयास येत आहे. ज्या क्षेत्रात जायचे, त्याचा चांगला अभ्यास करायचा. त्यातील अडचणी समजून घ्यायच्या आणि सोडविण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करायचे, हा त्यांच्या स्वभावातील विशेष गुण आहे. अध्यक्षपदाच्या काळात त्यांनी युवकांच्या हिताचेच निर्णय घेतले. त्यामुळे ते युवकांच्या हृदयसिंहासनावर विराजमान झाले. अत्यंत मनमिळावूपणा, आस्थेवाईकपणे चौकशी करणे, अडीअडचणी मनापासून समजावून घेणे, गरजूंना मदत करणे ही बाळासाहेबांची वृत्ती सर्वसामान्यांना आधार वाटत असते. अशा या लोकप्रिय युवक ह्रदयसम्राट यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

- शिवाजीराजे जाधव, दुधोंडी,

संस्थापक -शिवभवानी उद्योग समूह, दुधोंडी.