शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जयंतरावांच्या ताकदीवरच नगराध्यक्ष ठरणार

By admin | Updated: May 23, 2016 00:19 IST

सक्षम चेहऱ्याचा शोध : विरोधकांकडे मात्र प्रभावी नेत्याचा अभाव

अशोक पाटील --इस्लामपूर -आगामी पाच वर्षांसाठी जनतेतून नगराध्यक्ष निवडून देण्यासाठी कोणतेही आरक्षण पडले, तरी सत्ताधाऱ्यांकडे एकही नेता असा नाही, की तो स्वबळावर नगराध्यक्षपद मिळवू शकतो. ज्याच्या डोक्यावर आमदार जयंत पाटील यांचा वरदहस्त असेल, तोच भावी नगराध्यक्ष ठरणार आहे. याउलट विरोधी गटाचे मार्गदर्शक नेते, स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी कितीही प्रयत्न केला तरी, विरोधकांकडे सक्षम चेहरा नसल्याने जनेततून निवडून द्यावयाच्या नगराध्यक्ष निवडणुकीत जवळजवळ राष्ट्रवादीच बाजी मारणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.युती शासनाच्या काळात तत्कालीन मंत्री अण्णासाहेब डांगे यांची ताकद विरोधकांच्या पाठीशी होती. त्यामुळेच जनतेतून नगराध्यक्ष निवडीवेळी पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांच्याविरोधात आनंदराव मलगुंडे यांनी मोठे आव्हान उभे केले होते. आता हे दोघेही जयंत पाटील यांचे नेतृत्व मानून राष्ट्रवादीत कार्यरत आहेत. या दोघांनाही आता नगराध्यक्ष होण्याचा ध्यास लागला आहे. जर नगराध्यक्ष पदासाठी ओ. बी. सी. आरक्षण पडले, तर आनंदराव मलगुंडे, चिमण डांगे आणि संजय कोरे यांचा विचार राष्ट्रवादीतून होऊ शकतो.खुल्या पुरुष गटासाठी आतापासूनच विजयभाऊ पाटील यांचे नाव घेतले जात आहे. परंतु विजय पाटील हे नगराध्यक्ष पदासाठी चालणारच नाहीत, अशी चर्चा दबक्या आवाजात त्यांचेच काही हितचिंतक करू लागले आहेत. असे असले तरी राष्ट्रवादीमधील ज्येष्ठ नगरसेवक बी. ए. पाटील हे पक्षाने संधी दिल्यास नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविणार आहेत. अन्यथा ते स्वत:च्या प्रभागात काय आरक्षण पडते यावर लक्ष ठेवून आहेत. यावरुन त्यांची रणनीती ठरणार आहे. महिलांमधून माजी नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील यांचे नाव घेतले जाते. या नावाला विरोध करण्यासाठी कोणतीही महिला पुढे येण्याची चिन्हे सध्या तरी नाहीत.नवख्या चेहऱ्याला संधी देण्याचा विचारही जयंत पाटील यांच्याकडून होण्याची शक्यता आहे. याउलट विरोधी गटाची अवस्था दयनीय आहे. खा. राजू शेट्टी यांनी कितीही प्रयत्न केला तरी भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि इतर घटकपक्षांच्या नेत्यांचे मनोमीलन झाले तरीही अंतिम टप्प्यात वादाला तोंड फुटते, हा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे यांच्याकडे नगराध्यक्ष पदासाठी एल. एन. शहा यांचे नाव घेतले जात आहे. त्यांना विरोधकांची कितपत साथ मिळेल, यावरच सर्वकाही अवलंबून आहे....तर विरोधकांना चांगले दिवस येतील येणाऱ्या काळात भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, स्वाभिमानीचे सदाभाऊ खोत यांना मंत्रीपद मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. या दोघांची ताकद इस्लामपूर पालिकेच्या निवडणुकीत एकवटली, तर विरोधकांना चांगले दिवस येतील. परंतु शहरातील गट नेत्यांच्यातच अंतर्गत मतभेद असल्याने विरोधकांकडे ताकद असूनही त्याचा योग्य वापर होऊ शकत नाही.